शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

दुकानाचा बेकायदा ताबा; परस्परांविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:31 AM

मंजूर इलाही खान महम्मद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दूकानाबाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, अ. हबीब यांनी स्वत:च दुकान रिकामे करून दिल्याचे त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. 

ठळक मुद्दे ताबा घेण्याची प्रक्रिया चुकीची

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानामध्ये बुधवारी रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी दुकानाचा बेकायदा ताबा घेतल्याची तक्रार अ. हबीब यांनी केली, तर मंजूर इलाही खान महम्मद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दूकानाबाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, अ. हबीब यांनी स्वत:च दुकान रिकामे करून दिल्याचे त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) आणि मंजूर इलाही खान महम्मद खान या दोघांमध्ये मोहम्मद अली रोडवर हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार सोडा फॅक्टरी नावाच्या दुकान मालकीवरून दिवाणी न्यायालय व मुंबई येथील न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने मंजूर इलाही यांच्या बाजूने निकाल दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निकालानंतर मंजूर इलाही यांनी त्यांचे दुकान रिकामे करून देण्यासाठी अ. हबीब यांना सांगितले होते, त्यानुसार हबीब यांनी बुधवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान स्वत:च दुकान खाली करून दिल्याचे मंजूर इलाही यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पैशासाठी हबीब हे खोट्या तक्रारी करीत असल्याचे मंजूर इलाही यांचे म्हणणे आहे. तर अ. हबीब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे दुकान रात्री ३ वाजता जबरदस्तीने गुन्हेगारांनी खाली केले आहे. दोन्ही गटाकडून परस्पर तक्रारी करण्यात आलेल्या असून, पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.   दरम्यान या प्रकरणात दूकान रिकामे करण्याची प्रक्रिया सीसी कॅमेर्‍यात कैद झालीआहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास करायला हवा, न्यायालयाने विरोधी गटाच्या बाजूने निकाल दिलेला असेल तर त्यांनी गुंडांचा वापर करून अशा प्रकारे रात्रीच्या दरम्यान हातात शस्त्र घेऊन दुकान खाली करण्याची प्रक्रिया चुकीची असल्याचे  स्पष्ट होत आहे. 

ताबा घेण्याची प्रक्रिया चुकीचीन्यायालयाने दुकान मालकाच्या बाजूने निकाल दिला असला तरी दुकानाचा रात्री ताबा घेण्याची प्रक्रिया चुकीची असल्याची माहिती एका ज्येष्ठ विधिज्ञाने दिली. न्यायालयाच्या निकालानंतर दिलेल्या कालावधीत दुकान रिकामे न केल्यास न्यायालयात ऑर्डर २१ रूल २२ नुसार याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे, त्यानंतर न्यायालय निर्णय देइल त्यानुसार दुकानाचा ताबा मिळविता येतो; मात्र रात्रीच्यावेळी  जबरदस्तीनेदुकान खाली करण्याचा पर्याय नसून, ही प्रक्रिया चुकीची आहे.

मी माझे दुकान स्वत: रिकामे केले नाही. रात्रीच्यावेळी दुकान खाली करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बुधवारी रात्री ३ च्या दरम्यान गुंडांचा वापर करून माझे दुकान रिकामे केले आहे. न्यायालयाने माझ्या विरोधात निकाल दिलेला आहे की नाही, या संदर्भात पूर्ण माहिती नाही; मात्र अशा प्रकारे दुकान खाली केल्यामुळे मी तणावाखाली आहे. - अ. हबीब अ. सलाम-

टॅग्स :Ramdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा