तेल्हारा: पंचायत समिती सभापती लीलाबाई गावंडे यांचे पती देविदास रामभाऊ गावंडे यांनी कर्जबाजारीपणामुळे मंगळवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंडगाव ते तेल्हारा रोडवर दुचाकीवर असताना देवीदास गावंडे यांनी कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर त्यांनी कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक निळकंठ बचे यांना मोबाइल फोनद्वारे आपण कीटकनाशक प्राशन केल्याचे सांगितले. यानंतर त्यांचा शोध घेऊन सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून, त्यांनी कर्जबाजारीपणामुळे हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.
कर्जबाजारीपणामुळे सभापतींच्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: February 17, 2016 02:21 IST