शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

चारित्र्यावर संशय असल्याने, पतीने केली पत्नीची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:07 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे दोघा पती-पत्नींमध्ये नेहमीच खटके उडायचे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यात वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निघरुण हत्या केली.  सिव्हिल लाइन पोलिसांनी पतीस अटक केली. 

ठळक मुद्देघरातील पाटा घातला डोक्यातआरोपी पतीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे दोघा पती-पत्नींमध्ये नेहमीच खटके उडायचे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यात वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घालून तिची निघरुण हत्या केली.  सिव्हिल लाइन पोलिसांनी पतीस अटक केली. कृषी नगर परिसरातील न्यू भीम नगरात राहणारे गजानन सोनाजी तायडे(५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रमेश सोनाजी तायडे आणि कविता तायडे हे दोघे पती-पत्नी असून, त्यांना एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. रमेश हा गवंडी काम करायचा. त्याला दारुचे व्यसन आहे. रमेश तायडे हा त्याची पत्नी कविता हिच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घ्यायचा आणि कोणत्याही पुरुषाकडे संशयाने पाहायचा. काही व्यक्तीविरुद्ध तो नेहमीच पत्नीला पोलिसात तक्रार देण्यास सांगायचा; परंतु पत्नी त्याला नकार द्यायची. गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्वांनी भोजन घेतल्यानंतर सर्व झोपी गेले.  मुलगा जय(१६)याला तहान लागल्यामुळे तो पहाटेच उठला. त्याला पाणी देण्यासाठी कवितासुद्धा झोपेतून उठली. तिने मुलाला पाणी दिले. आरोपी रमेश तायडे हा सुद्धा जागा झाला. मुलगा रनिंग करण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पती रमेशने कवितासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढत गेला. रागाच्या भरात रमेश तायडे याने पत्नी कविताच्या डोक्यात घरातील दगडी पाटा घातला. यानंतरही त्याने  पाट्याने कविताच्या डोक्यावर तीन ते चार वेळा वार केले. जबर मारामुळे कविता जागीच गतप्राण झाली. घरात झोपलेल्या मुलीने हा प्रकार पाहिल्यावर शेजारी राहणारे मोठेबाबा गजानन तायडे यांना माहिती दिली. त्यांनी घरात येऊन पाहिल्यावर कविता रक्ताच्या थारोळय़ात पडली होती. गजानन तायडे यांनी सिव्हिल लाइन पोलिसांना तातडीने माहिती दिल्यावर ठाणेदार अन्वर शेख घटनास्थळावर हजर झाले. शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनीसुद्धा घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी आरोपी रमेश तायडे याला अटक केली.  पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. 

रमेश तायडे हा मानसिक रुग्ण?आरोपी रमेश तायडे याचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचार घेत असताना, तो कोमामध्ये होता. त्यातून तो बरा झाला; मात्र मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याने, कुटुंबियांसोबत तो विचित्र वागायचा. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिला कोणत्याही पुरुषाच्या विरुद्ध पोलिसात तक्रार द्यायला सांगायचा, अशी माहिती पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आली.

 

टॅग्स :Civil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा