पतीने पत्नीला पेटविले
By Admin | Updated: May 30, 2014 20:46 IST2014-05-30T20:40:56+5:302014-05-30T20:46:34+5:30
विवाहितेस तिच्या पतीने पेटवून दिल्याची घटना बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे घडली.

पतीने पत्नीला पेटविले
बाळापूर : एका विवाहितेस तिच्या पतीने रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना तालुक्यातील वाडेगाव येथे घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, वाडेगाव येथील वनिता मनोहर डोंगरे नामक महिलेला जळालेल्या अवस्थेत अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर महिलेने रुग्णालयात कार्यकारी दंडाधिकार्यांसमोर जबाब नोंदविताना पती मोहन डोंगरे यानेच आपल्याला पेटवून दिल्याचा आरोप केला. आपण स्वयंपाक करीत असताना पतीने आपल्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा जबाब वनिता डोंगरे हिने नोंदविला आहे. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहन डोंगरे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.