माहेरच्यांनी पत्नीचे अपहरण केल्याची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 11:12 IST2020-09-06T11:09:15+5:302020-09-06T11:12:57+5:30

अकोला : पत्नीला गणेशोत्सवासाठी माहेरी बोलावून माहेरच्यानी तिचे अपहरण केल्याची तक्रार पतीने सिव्हिल लाइन्स तसेच जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. 

Husband file Complaint of wife's abduction | माहेरच्यांनी पत्नीचे अपहरण केल्याची पोलिसात तक्रार

माहेरच्यांनी पत्नीचे अपहरण केल्याची पोलिसात तक्रार

अकोला : पत्नीला गणेशोत्सवासाठी माहेरी बोलावून माहेरच्यानी तिचे अपहरण केल्याची तक्रार पतीने सिव्हिल लाइन्स तसेच जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. 
वाशिम बायपास परिसरातील यशवंत नगरमधील रहिवासी प्रफुल्ल प्रल्हाद धाडसे यांचा मोठी उमरीतील रहिवासी माधुरी चव्हाण-धाडसे हिच्याशी प्रेमविवाह झाला. त्यानंतर गत मार्च महिन्यापासून ते दोघेही सोबत राहत होते. दरम्यान, माधुरीच्या आई-वडिलांनी दोघांनाही गणपती स्थापनेसाठी २१ आॅगस्ट रोजी मोठी उमरी येथील घरी बोलावले. त्यानंतर गणपती स्थापना तसेच कार्यक्रम पार पडल्यानंतर माधुरीचे कुटुंबीय सागर चव्हाण, प्रताप चव्हाण व वनमाला चव्हाण यांनी माधुरीला एक दिवस मुक्काम करण्याची विनंती केली. त्यानुसार प्रफुल्ल चव्हाण यांनी पत्नीला माहेरी सोडून घरी परतले. तसेच दुसऱ्या दिवशी पत्नीला आणण्यासाठी गेले असता त्यांची पत्नी तिथे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पत्नी कुठे आहे, या संदर्भात विचारणा केली असता तिच्या कुटुंबीयांनी टाळाटाळ केली. त्यामुळे माधुरीचे पती प्रफुल्ल धाडसे यांनी पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात केली असून, तिचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.

 

Web Title: Husband file Complaint of wife's abduction