मूर्तिजापूर : दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या पती-पत्नीत वाद झाला. या वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना ३ आॅक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी पती रवी हरिदास बांगल याने दोन वर्षांपूर्वी येथील प्रतीक नगरामधील अश्विनी गजानन ढोकणे हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता; परंतु काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून खटके उडत. शनिवारी दोघांमध्ये वाद झाला. पती रवी हरिदास बांगल (२९) याने पत्नी अश्विनी (२५) हिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून जखमी केले. या संदर्भात जखमी अश्विनीचा भाऊ अभिषेक गजानन ढोकणे याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
धारदार शस्त्राने पत्नीवर हल्ला; पती गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 11:43 IST
Husband attcked his wife पती रवी हरिदास बांगल याने पत्नी अश्विनी हिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून जखमी केले.
धारदार शस्त्राने पत्नीवर हल्ला; पती गजाआड
ठळक मुद्दे ही घटना ३ आॅक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून खटके उडत. पतीविरुद्ध भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.