शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 18:21 IST

Agriculture News : सोयाबीन काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून असल्याने ते सडले आहे.

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवार दुपारपासूनच जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होऊन बळीराजा संकटात पडला आहे.ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून असल्याने ते सडले आहे. या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणले आहे.             दिवाळी सण तोंडावर असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे दिवाळ निघाले आहे. वर्षभर  शेतात राब-राब राबून अथक परिश्रमाने पिकविलेले सोयाबीन, कपासी, तूर, मुग आदी पिकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. सोयाबीन व ज्वारी पिकाची काढणी सुरू असताना त्यावर धो-धो पाऊस आल्याने संपूर्ण पिके उध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात शनिवार पासून सतत पाऊस सुरू आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने सवड दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस, भूईमुग यांसारखी पिके काढणी सुरू असतांना पाण्याखाली गेली आहे. बहुतेक शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहे. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा हिरावल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कापसाच्या बोंड्या पावसामुळे सडल्या आहे. शासनाने नुकसान ग्रस्तांची त्वरित पाहणी करून कृषी विभागाच्या व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे व प्रशासनाच्या वतीने दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती