अकोला शहरातील खंगरपुरा येथे घर कोसळले
By Admin | Updated: June 27, 2014 01:33 IST2014-06-27T01:31:06+5:302014-06-27T01:33:48+5:30
अकोला शहरातील खंगरपुरा परिसरातील एक घर कोसळले; सुदैवाने दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही.

अकोला शहरातील खंगरपुरा येथे घर कोसळले
अकोला- खंगरपुरा परिसरातील एक घर कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नाही.
गुळाचे व्यापारी हारूणभाई गुडवो हे खंगरपुरा परिसरात राहतात. त्यांचे घर हे ३0 वर्षे जुने आहे. तळमजल्यावर गोदाम आहे. काही दिवसांपासून गोदामातील भिंतीचे प्लास्टर सुरू आहे. बांधकाम सुरू असतानाच गुरुवारी भिंतींना तडे गेले. काही वेळानंतर प्लास्टरचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हारूण यांचे कुटुंबीय घराबाहेर पडले. संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास घर कोसळले. घराजवळ उभी असलेली बिलालभाई ठेकिया यांची एम.एच-30-ए.एफ-2585 या क्रमांच्या कारवर बांधकाम साहित्य पडल्याने कारचे काच फुटले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान आणि रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.