मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी; जिल्ह्यात ३९ मि.मी. पावसाची नोंद!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:34 IST2019-08-01T14:34:05+5:302019-08-01T14:34:18+5:30

अकोला : गत चोवीस तासांत बुधवार, सकाळी ८.३० वाजतापर्यंत जिल्ह्यात ३९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली.

Heavy rains in Murtijapur taluka; The district has 39 mm. Report of rain! | मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी; जिल्ह्यात ३९ मि.मी. पावसाची नोंद!  

मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी; जिल्ह्यात ३९ मि.मी. पावसाची नोंद!  

अकोला : गत चोवीस तासांत बुधवार, सकाळी ८.३० वाजतापर्यंत जिल्ह्यात ३९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. या तालुक्यात चोवीस तासांत १०० मि.मी. चार इंच पावसाची नोंद करण्यात आली. गुरुवार, १ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे.
गत सात दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे; परंतु पावसात जोर नव्हता. मंगळवार, ३० जुलै ते बुधवार, ३१ जुलै सकाळी ८.३० वाजतापर्यंत जोरदार पाऊस झाला असून, जिल्ह्यातील शेतकरी या पावसामुळे सुखावला. दरम्यान, बार्शीटाकळी तालुक्यात दोन इंच म्हणजेच ५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अकोेला, अकोट, पातूर व तेल्हारा तालुक्यात प्रत्येकी ४० मि.मी. पाऊस बरसला.

 

Web Title: Heavy rains in Murtijapur taluka; The district has 39 mm. Report of rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.