गुडधी रेल्वे गेट राहणार तीन दिवस बंद; पर्यायी मार्गाचा वापर करन्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 15:26 IST2022-09-17T15:26:01+5:302022-09-17T15:26:42+5:30
अकोला ते अमरावती या रेल्वे मार्गावर शहरानजीक गुडधी ग्रामपंचायतच्या हद्दीत रेल्वे गेट आहे.

संग्रहित छायाचित्र.
अकोला :अकोला ते अमरावती या रेल्वे लाईनवर असलेल्या अकोला शहरानजीकचे गुडधी रेल्वे गेट शनिवारी दुपारी ३ वाजेपासून सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अकोला ते अमरावती या रेल्वे मार्गावर शहरानजीक गुडधी ग्रामपंचायतच्या हद्दीत रेल्वे गेट आहे. या ठिकाणी दोन दिवस कामकाज चालणार असल्याने हे रेल्वे गेट प्रवाशांना ये जा करण्यासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.
या रेल्वे गेट परिसरातून सांगळूद, धोतरडी, पळसो, दहिगाव गावंडे, कौलखेड, गाजीपुर, गोरेगाव, चिखली, मुर्तीजापुरकडे प्रवासी ये जा करतात; मात्र तीन दिवस आता हे गेट बंद राहणार असल्याने प्रवाशांनी उमरी परिसरातील इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.