शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बांधकामाच्या देयकातून ‘जीएसटी’ची नियमबाह्य कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:50 PM

अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा प्रकार नियमबाह्य असून, त्याची चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण विभागाच्या कामाच्या देयकातून जीएसटी शुल्काची कपात करण्याचा आदेश तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी दिला होता.त्यामुळे एकाच कामासाठी दोनदा जीएसटी वसुली सुरू होती. या प्रकाराची चौकशी करून शासन निर्णयात स्पष्टता आणावी, या मागणीच्या तक्रारी शासनाकडे झाल्या आहेत. त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना बजावण्यात आले आहे.

अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा प्रकार नियमबाह्य असून, त्याची चौकशी सुरू आहे. त्याचवेळी कपात केलेला निधी संबंधिताना देण्याबाबत मुख्य वित्त व लेखा अधिकाºयांनी मंगळवारी गटविकास अधिकाºयांना सांगितले. जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत खोणे, भारिप-बमसंचे माजी तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम अहिर, माजी पंचायत समिती सदस्य विलास जगताप यांनी याबाबत अधिकाºयांची भेट घेऊन समस्येवर उपाय करण्याची मागणी केली.समाजकल्याण विभागाच्या कामाच्या देयकातून जीएसटी शुल्काची कपात करण्याचा आदेश तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी दिला होता. त्यामुळे एकाच कामासाठी दोनदा जीएसटी वसुली सुरू होती. या प्रकाराची चौकशी करून शासन निर्णयात स्पष्टता आणावी, या मागणीच्या तक्रारी शासनाकडे झाल्या आहेत. त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना बजावण्यात आले आहे.समाजकल्याण विभागाने दलित वस्तीच्या कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून पंचायत समिती स्तरावर राखीव ठेवण्याचा आदेश बार्शीटाकळीच्या गटविकास अधिकाºयांना दिला. त्यानुसार देयकातून निधीची कपात करण्यात आली. हा आदेश सरसकट सर्वत्र लागू करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दलित वस्ती विकास योजनेची कामे केली आहेत. त्या कामांची देयके सादर केली आहेत. त्यामध्ये कामात वापरलेले सर्व साहित्य जीएसटीधारकांकडूनच खरेदी केले आहे. त्याच्या जीएसटी रकमेसह पावत्या देयकांसोबत जोडल्या आहेत. सोबत सिमेंट, रेती, गिट्टी, मुरूम या साहित्य पुरवठादारांनी दिलेल्या पावत्यांमध्येही जीएसटी कपातीची नोंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी साहित्य जीएसटी भरूनच खरेदी केलेले आहे. त्याच कामाच्या देयकातून पुन्हा १२ टक्के जीएसटी शुल्क म्हणून राखीव ठेवावा, असे आदेशात म्हटले. त्यामुळे एकाच कामासाठी एकाच वेळी ग्रामपंचायतींकडून दोन वेळा जीएसटी वसूल केला जात आहे. ही बाब कोणत्या नियमात बसते, याची माहितीही गट ग्रामपंचायत चोहोगावच्या सरपंच लीलाबाई अशोकराव कोहर यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातील तक्रारीतून मागवली. त्यानुसार याप्रकरणी चौकशी करावी, तसेच ज्या ग्रामपंचायतींच्या देयकातून १२ टक्के निधी राखून ठेवण्यात आला, तो तातडीने अदा करावा, अशी मागणीही कोहर यांनी केली होती. त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे. लाखो रुपयांची कपातबांधकामाच्या देयकातून जीएसटीच्या रूपात लाखो रुपयांची कपात पंचायत समिती स्तरावर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायती, कंत्राटदारांचे मोेठे नुकसान होत आहे; ते थांबवा, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य खोणे, अहिर, जगताप यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे.एस. मानमोठे यांच्याकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी सेवाकर म्हणून दोन टक्के रक्कम कपात करणे योग्य आहे. १२ टक्के कपातीची गरज नाही, तसेच कपात केलेला निधी परत करण्याचेही लेखा विभागातील कर्मचाºयांना सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBarshitakliबार्शिटाकळीGSTजीएसटी