शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

अकोल्यात ‘रिचार्ज शाप्ट’द्वारे भूजल पुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 13:42 IST

अकोला : अपुऱ्या पावसामुळे अकोला शहरावर जलसंकट कोसळले असून, शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा प्रकल्पातील मृत जलसाठा उचलण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशहरातील विविध भागांमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे. पावसाच्या पाण्याचे ‘रिचार्ज शाप्ट’द्वारे पुनर्भरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. राज्यात प्रथमच शहरी भागामध्ये अकोला महापालिका क्षेत्रात हा उपक्रम सुरू आहे.

अकोला : अपुऱ्या पावसामुळे अकोला शहरावर जलसंकट कोसळले असून, शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा प्रकल्पातील मृत जलसाठा उचलण्याची वेळ आली आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, पावसाच्या पाण्याचे ‘रिचार्ज शाप्ट’द्वारे पुनर्भरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, शहरातील विविध भागांमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे. विशेष म्हणजे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ग्रामीण भागात हा उपक्रम राबविते; मात्र राज्यात प्रथमच शहरी भागामध्ये अकोला महापालिका क्षेत्रात हा उपक्रम सुरू आहे.राज्य शासनाने पाणी टंचाई निवारणार्थ अकोला शहराकरिता नवीन विंधन विहिरीकरिता निधी मंजूर केला आहे, याकरिता सर्वेक्षण करीत असताना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अतिशय कमी कालावधीत सर्वेक्षण तर केलेच; पण पुनर्भरणासाठी रिचार्ज शाप्ट (पुनर्भरण स्तंभ) व जलभंजन करण्याचे महानगरपालिकेला सुचविले. महापौर विजय अग्रवाल व आयुक्त जितेंद्र वाघ यांना ही संकल्पना आवडल्याने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच भूजल विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. प्रवीण कथने यांच्या मार्गदर्शनात सहा. भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे यांनी शहराची पाहणी करून महानगरपालिका क्षेत्रात ५० जलभंजन व ४०० रिचार्ज शाप्टसाठी जागा निश्चित केल्या. या कामास महापालिकेने तत्काळ निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कामाला सुरुवात झाली आहे. शहरातील रामदासपेठ उमरी, न्यू तापडिया नगर, मनकर्णा प्लॉट, देशमुख फैल, मोहता मिल परिसर, सिंधी कॅम्प, जठारपेठ येथे रिचार्ज शाप्ट तयार करण्यात आले आहेत.

सिटी कोतवाली परिसरात घेतली चाचणी!सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस रिचार्ज शाप्ट तयार केले असून, त्याच्या भूस्तराची क्षमता चाचणी घेण्यात आली असता रिचार्ज शाप्टने ५००० लीटर पाणी ३० मिनिटांत शोषून घेतले. त्यावेळी महापौर विजय अग्रवाल, आयुक्त जितेंद्र वाघ तसेच वरिष्ठ भूवैज्ञानिक रवींद्र शेलार, सहा. भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे व भूसवियंचे कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका