शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
2
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
3
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
4
मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?
5
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडली गेली...
6
हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू
7
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
8
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
9
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
10
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
11
इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड
12
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
13
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
14
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
15
Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला
16
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
17
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
18
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
19
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
20
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले

अस्सं माहेर नको गं बाई”तर्फे आयोजित ऑनलाइन वेबिनारला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 6:31 PM

‘लोकमत सखी मंच व सोनी मराठी’चा उपक्रम

अकोला : लग्नानंतर प्रत्येक मुलीला माहेरी आपल्या नवऱ्याचं काैतुक व्हावं, अस वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतु जेव्हा हेच काैतुक प्रमाणापेक्षा जास्त होतं व नकळतपणे माहेरच्या माणसांचं आपल्याकडे दुर्लक्ष होतं असं जेव्हा त्या मुलीला वाटू लागतं तेव्हा त्या मुलीची ही गोड तक्रार नक्कीच ऐकायला मिळते आणि ती म्हणजेच “अस माहेर नको गं बाई”

याला अनुसरुन सोनी मराठी वाहिनीवरील सुरु असलेली ही मालिका अत्यंत अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाली आहे आणि याच निमित्ताने लोकमत सखी मंच व सोनी मराठी यांच्या वतीने सखी सदस्यांसाठी ‘जावई म्हणे असे सासर सुरेख बाई’  ही एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शुक्रवार दि. २२ जानेवारी रोजी लोकमत फेसबुकवर ऑनलाइन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनी मराठीवरील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातल्या सखी सदस्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी “अस्सं माहेर नको गं बाई ”. या मालिकेतील स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर यांनी  मालिकेविषयी, त्यांच्या भुमिकेविषयी तसेच सेटवरच्या अनेक गमतीजमती सांगत अगदी हसतखेळत संवाद साधला. स्वानंदी टिकेकर हिने सखींच्या आलेल्या गाण्याच्या फर्माइशीही पूर्ण करत आपल्या गोड आवाजात गाणी सादर करुन सखींना मंत्रमुग्ध केले तर पुष्कराजनेही रॅपिड फायर प्रश्नांची उत्तरे दिली.

सोबत जिगरबाज व श्रीमंताघरची सून या मालिकेतील पल्लवी पाटील, अमृता पवार, यशोमान आपटे व रूपलनंद याही कलाकारांनी मालिका व त्यांच्या भुमिकेबद्दल अनुभव सांगितले. लोकमत सखी मंच व सोनी मराठी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ जावई म्हणे अस्सं सासर सुरेख बाई’ या स्पर्धेस सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच या स्पर्धेतील काही निवडक विजेत्यांना या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी करण्यात आले होते. यावेळी विजेत्या सखींनी माहेरच्यांशी आपल्या नवऱ्याचं नातं कसं आहे याबद्दलच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, नावीन्यपूर्ण कथा, उत्तम सादरीकरण या सगळ्यांच्या बळावर एकंदरीत सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी  निखळ मनोरंजनाचा आनंद देत असून, सर्व मालिका व कलाकारांना प्रेक्षकांची पसंती लाभ आहे. “अस्सं माहेर नको गं बाई ” ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.०० वा., श्रीमंताघरची सून रात्री ०८.००वा. तर जिगरबाज ही मालिका रात्री १०.३०. वा. प्रसारित होते. लाइव्ह कार्यक्रम सुरु असतानाही सखींना मालिका व कलाकरांबद्दल प्रश्न विचारण्यात आले व सखींनीही प्रश्नांची उत्तरे देऊन प्रतिसाद दिला तसेच  यंदाच्या वर्षी लोकमत सखी सदस्यांसाठी २०२१ चे नूतनीकरण नि:शुल्क केल असून, त्याच ओळखपत्रावर आगामी कार्यक्रमांना प्रवेश दिला जाणार असून, लोकमत समूहाच्या वतीने सखी सदस्यांसाठी ही संक्रांतीच्या शुभशकुनाची भेट असणार आहे.

स्पर्धेतील विजेतेरोहिणी यादव, अहमदनगरलुनाक्षी सोनारकर, नागपूरविजया कातकाडे, परभणीपूर्वा निकम, नाशिकडाॅ. शिल्पा जोशी, पुणे