परतीच्या पावसाचे चित्र धूसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:35 IST2017-10-23T00:35:47+5:302017-10-23T00:35:58+5:30
अकोला : विदर्भातील शेतकरी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, पण कृषी हवामान शास्त्रानुसार परतीच्या पावसाचे चित्र धूसर सांगण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी अकोला शहर व लगतच्या भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

परतीच्या पावसाचे चित्र धूसर!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भातील शेतकरी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, पण कृषी हवामान शास्त्रानुसार परतीच्या पावसाचे चित्र धूसर सांगण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी अकोला शहर व लगतच्या भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, येत्या २४ तासांत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. विदर्भात कमी पाऊस झाल्याने धरणात कमी जलसाठा आहे. पश्चिम विदर्भातील सर्व लघू, मध्यम व मोठे धरण मिळून ५0.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्या काटेपूर्णा धरणात २0.९४ टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे अकोलेकरांवर जलसंकट उभे ठाकले आहे. म्हणूनच यावर्षी शेतकर्यांसह नागरिकांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मागील २४ तासांत विदर्भातील अकोल्यासह अमरावती येथे ११ मि.मी.,चंद्रपूर १.0 मि.मी., नागपूर येथे ४.३ मि.मी., तर वर्धा येथे 0.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, तापमानात वाढ होत असून, अकोल्याचे कमाल तापमान ३६.५ अंश होते. बुलडाणा ३३, ब्रम्हपुरी ३५, चंद्रपूर ३३.५, वर्धा ३४.५, तर यवतमाळचे तापमान ३२.0 डिग्री सेल्सिअस एवढे होते.
विदर्भातील पावसासाठीचे वातावरण मोकळे होत असून, परतीच्या पावसाचे चित्र धूसर आहे.
डॉ.आर.एन. साबळे,
ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ, पुणे.