रुग्णांच्या नातेवाईकांना ‘मदतीचा एक घास ’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST2021-05-18T04:20:26+5:302021-05-18T04:20:26+5:30
अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात महिला काँग्रेसच्या वतीने ‘मदतीचा एक घास’ या उपक्रमांतर्गत सोमवारी रुग्णांच्या गरजू नातेवाईकांना भोजन वाटप ...

रुग्णांच्या नातेवाईकांना ‘मदतीचा एक घास ’!
अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात महिला काँग्रेसच्या वतीने ‘मदतीचा एक घास’ या उपक्रमांतर्गत सोमवारी रुग्णांच्या गरजू नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने रुग्ण व रुग्णांच्या गरजू नातेवाईकांसाठी '' मदतीचा एक घास'' उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी आमदार प्रणिती शिंदे व प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात अकोला शहर महिला काँग्रेसच्या वतीने सोमवार, १७ मे रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात रुग्णांच्या गरजू नातेवाईकांना भोजनाचे डबे वाटप करण्यात आले. महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पुष्पा देशमुख, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. वर्षा बडगुजर, नगरसेविका विभा राऊत यांच्या नेतृत्वात रुग्णांच्या शंभर गरजू नातेवाईकांना भोजनाचे डबे वाटप करून '' मदतीचा एक घास'' उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शहर महिला काँग्रेसच्या अश्विनी देशमुख, वर्षा सपकाळ, रेवती तवर, कीर्ती देशमुख यांनी योगदान दिले.
.........फोटो......