अकोला जिल्ह्यात १२ हजार घरकूल लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:04 IST2021-02-23T19:04:39+5:302021-02-23T19:04:53+5:30
Akola News १२ हजार १८५ लाभार्थींच्या खात्यात पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात १२ हजार घरकूल लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा!
अकोला: पंतप्रधान आवास योजना व रमाइ आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत २०२०....२१ या आर्थिक वर्षात घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थींपैकी २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्हयात १२ हजार १८५ लाभार्थींच्या खात्यात पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात १० हजार ४७ आणि रमाइ आवास योजनेंतर्गत ३ हजार ९१४ लाभार्थींना घरकूल मंजूर करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण १३ हजार ९६२ लाभार्थींना घरकूल मंजूर करण्यात आले. घरकूल योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभाथींना घरकूल बांधकामासाठी प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयेप्रमाणे अनुदान दिले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील घरकूल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थींना घरकूल अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये २२ फेब्रुवारीपर्यत जिल्ह्यातील १२ हजार १८५ लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपयेप्रमाणे घरकूल अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजना व रमाइ आवास योजना (ग्रामीण ) अंतर्गत जिल्ह्यात २०२०....२१ या वर्षात घरकूल मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाभार्थींपैकी २२ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार १८५ लाभार्थींच्या खात्यात घरकूल अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
- सुरज गोहाड, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
जिल्ह्यात घरकूल मंजूर
पंतप्रधान आवास योजना १० हजार ४७
रमाइ आवास योजना ३ हजार ९१४
अनुदान १ लाख २० हजार