शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गोदामांची तपासणी होणार

By admin | Updated: February 19, 2015 00:26 IST

राज्यातील १0२४ धान्य उचल व वितरण रेकॉर्डची होणार तपासणी

नीलेश शहाकार / बुलडाणा: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राज्यातील शासकीय धान्य गोदामांची तपासणी केली जाणार आहे. असे आदेश शासनाच्या पुरवठा विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यातील पुरवठा अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. या प्रक्रियेत राज्यातील १0२0 धान्य गोदामातून करण्यात आलेली धान्याची उचल आणि केलेले वितरण, याबाबतच्या रेकॉर्डची पडताळणी केली जाणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) आणि अंत्योदय योजनेंतर्गत राज्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमधून दरमाह धान्याचे वितरण केले जाते. त्यासाठी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून आवश्यक असलेल्या धान्यसाठय़ाची मागणी दरमाह शासनाच्या पुरवठा विभागाकडे करण्यात येते. मागणीनुसार (नियतन) उपलब्ध झालेला धान्यसाठा प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावर शासकीय धान्य गोदामांच्या ठिकाणी वितरित करण्यात येतो. धान्याचे मंजूर नियतन, तालुकास्तरावर धान्य गोदामांच्या ठिकाणी करण्यात आलेली धान्याची उचल आणि त्यामधून प्रत्यक्ष वितरित करण्यात आलेला धान्यसाठा, तसेच गोदामांमध्ये सद्यस्थितीत उपलब्ध असलेला धान्यसाठा याची वर्षातून एकदा तपासणी केली जा ते. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत निश्‍चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार महसूल विभागांतर्गत अधिकार्‍यांकडून गोदामनिहाय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील ११२ धान्य गोदामांची तपासणी करण्याचे आदेश अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत १२ फेब्रुवारी रोजी संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. एका जिल्ह्यातील महसूल अधिकारी दुसर्‍या जिल्ह्यात नमून दिलेल्या धान्य गोदामांची तपासणी करणार आहेत. या तपासणीत धान्यसाठय़ातील अनियमिततेसंबंधी विशेष पडताळणीही केली जाणार आहे.*बुलडाणा जिल्ह्यात १६ गोदामांची तपासणीजिल्ह्यात मलकापूर, मोताळा, नांदूरा, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, चिखली, मेहकर, डोणगाव, साखरखेर्डा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, अमडापूर, बुलडाणा, जळगाव जमोद अश्या १६ शासकीय गोदामांतील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य उचल आणि केलेले वि तरण, याबाबतच्या रेकॉर्डची पडताळणी केली जाणार आहे.