सरकारला माझ्या सभांची धास्ती -अॅड. प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 15:49 IST2019-10-11T15:49:19+5:302019-10-11T15:49:24+5:30
माझ्या हेलिकॉप्टरला उतरविण्याची परवानगी ऐनवेळी नाकारल्या जात असल्याचा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

सरकारला माझ्या सभांची धास्ती -अॅड. प्रकाश आंबेडकर
- राजेश शेगोकार
अकोला: लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखविली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचा प्रभाव रोखण्यासाठी सरकार शासकीय यंत्रणांना हाताशी धरून माझ्या हेलिकॉप्टरला उतरविण्याची परवानगी ऐनवेळी नाकारल्या जात असल्याचा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवार उभे केले असून, अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांसाठी पक्षाने नियोजन केले आहे. प्रचाराची दिवस सभांची संख्या लक्षात घेता, अॅड. आंबेडकर हे हेलिकॉप्टरचा वापर करीत आहेत; मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरला सभांच्या ठिकाणी उतरण्याची परवानगी ऐनवेळी नाकरली जात असल्याचे समोर आले आहे. गुरुवार, १० आॅक्टोबर रोजी त्यांची वलगाव येथे सभा होती; मात्र त्यासाठी त्यांना वलगाव येथे हेलिकॉप्टर उरविण्याची परवानगी नाकारली. सुरक्षेच्या कारणांवरून ही परवानगी नाकारली असल्याचे कारण यंत्रणांनी दिले असले तरी त्यामध्ये छुपा हेतू काय आहे, हे स्पष्ट होते, असा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.
-येथे रद्द झाली परवानगी!
बल्लारशा, अहेरी व वलगाव या तीन ठिकाणच्या जाहीर सभांसाठी हेलिकॉप्टरची परवानगी प्रशासनाने नाकारली, असेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.