जनसामान्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 04:53 PM2018-12-30T16:53:45+5:302018-12-30T16:58:27+5:30

अकोला : दिवसेंदिवस आरोग्यावर होणारा महागडा खर्च सर्व साधारण कुटूंबातील रुग्णांना करणे परवडणारे नसते यासाठी शासनाने जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोला शहरात महाआरोग्य अभियान रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन केले आहे.शासन आरोग्यसेवा पुरविण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

Government is committed to provide health services to the masses - Dr. Ranjit Patil | जनसामान्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

जनसामान्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Next
ठळक मुद्देशास्त्री स्टेडियम येथे महाआरोग्य अभियान रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सकाळी 9.30 वाजता आरोग्य शिबीराला भेट दिली. शिबीरात तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांच्या तपासणीसह चाचण्या, औषध-उपचार आदी सुविधा.

अकोला : दिवसेंदिवस आरोग्यावर होणारा महागडा खर्च सर्व साधारण कुटूंबातील रुग्णांना करणे परवडणारे नसते यासाठी शासनाने जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोला शहरात महाआरोग्य अभियान रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन केले आहे.शासन आरोग्यसेवा पुरविण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

शास्त्री स्टेडियम येथे महाआरोग्य अभियान रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सकाळी 9.30 वाजता आरोग्य शिबीराला भेट दिली. त्यांनी यावेळी रूग्ण नोंदणी कक्ष , औषधी वितरण विभाग, ब्लड  डोनेशन कॅम्प ,रेडिओलॉजी , पॅथालॉजी,किडनीरोग तज्ञ,दंतविभाग, शल्यचिकित्सा विभाग, अस्थीरोग, बालरोग, स्तन कर्करोग तपासणी विभाग, मातृ दुधपेढी,  स्त्रीरोग, प्रसुतीरोग, नेत्ररोग, मनोविकार विभाग, मेंदूरोग ,कर्करोग, होमोपॅथी,  सुपर स्पेशालिटी, ह्दयरोग, जनरल रूग्ण तपासणी विभाग, ओझोन हॉस्पीटलचा स्टॉल, निमाचा स्टॉल, आदि 30 स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार हरिष पिंपळे, शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, उप अधिष्ठाता डॉ. घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नैताम, पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी डॉ अपर्णा पाटील, डॉ. मनिष शर्मा, डॉ. सुराटे, माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. नरेश बजाज, माजी महापौर उज्वलाताई देशमुख , माजी नगराध्यक्ष  हरिश अलिमचंदानी , नगरसेवक आशिष पवित्रकार , जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी आदी मान्यवर होते.

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सर्व सटॉलला भेट देवून तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना  रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा दयावी व त्यांच्या तक्रारीचे  योग्य उपचार व वैदयकीय सल्ला देवून निरासरण करावे असे सांगुन तेथे  उपस्थित असलेल्या रूग्णांची आस्थेने पालकमंत्री यांनी विचारपूस केली. तसेच भोजन करून जाण्याबद्दल सांगितले. यामुळे रूग्ण भारावुन गेले.

पालकमंत्री यांनी  यावेळी राष्ट्रीय तंबाखू  नियंत्रण कार्यक्रम , कर्करोग , थॅलेसिमीया , आरोग्य प्रदर्शनी व पारिचारीका रूग्णालय कक्षाला भेट दिली. यानंतर डॉ. रणजीत पाटील यांनी रूग्णांसाठी श्री गजानन महाराज संस्थाव्दारे देण्यात येणा-या भोजनाचा आस्वाद घेतला. आरोग्य विभाग व विविध स्वयंसेवी संस्थानी  आरोग्य  यंत्रणा व भोजन व्यवस्था चोख ठेवली असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 

सर्वांसाठी विनामुल्य असणाऱ्या या शिबीरात तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांच्या तपासणीसह चाचण्या, औषध-उपचार आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे विविध विभागाचे  विभाग प्रमुख, संबंधीत विभागातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी ,  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय महाविदयालयाचे विदयार्थी , पारिचारीका प्रशिक्षण केंद्राच्या विदयार्थ्यांनी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका, निमा व रोटरी व अन्य स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  प्रयत्न करीत आहेत.

एक्स रे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी,  विविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली  आहेत. यासाठी आठ औषधीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यासाठी अकोला जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोशिएशनने सहकार्य केले आहे. या आरोग्य शिबीरात तपासणी केल्यानंतर रुग्णांसाठी उदयापासून  शासकीय सर्वोपचार रुग्णालय येथे महाआरोग्य शिबीर रूग्ण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यापुढील रूग्णांची सेवा या कक्षाव्दारे पुरविली जाणार आहे.  दुर्धर आजारांचे निदान झालेल्या  रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात उपचार उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

रुग्णांच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आलेली आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत जनजागृती होण्यासाठी या दोन्ही योजनांचे स्टॉल या अभियानात लावण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना या योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी स्टॉलवर सुविधा उपलब्ध करुन दिली गेली होती. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्डचे वाटप पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही लाभार्थ्यांना देण्यात आले.

Web Title: Government is committed to provide health services to the masses - Dr. Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.