शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गुडबाय २०१८ :  अकोला महापालिकेतील सकारात्मक घडामोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:32 IST

 ‘पीएम’आवास योजना; ‘डीपीआर’ला केंद्राची मान्यता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मनपाने शहरात सर्व्हे केला असता ६३ हजार लाभार्थींची नोंद करण्यात आली. ...

 ‘पीएम’आवास योजना; ‘डीपीआर’ला केंद्राची मान्यतापंतप्रधान आवास योजनेंतर्गत मनपाने शहरात सर्व्हे केला असता ६३ हजार लाभार्थींची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शिवसेना वसाहतमधील ७३० घरांच्या प्रकल्प अहवालाला (डीपीआर) केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली. वर्षभराच्या कालावधीत ८० घरांचे बांधकाम पूर्ण होऊ शकले.मोर्णा नदी स्वच्छता अभियान; मनपाचा पुढाकारजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संकल्पनेतील मोर्णा नदी स्वच्छता अभियानात महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. जलकुंभी काढण्यासाठी महापौर,आयुक्त , उपायुक्तांसह सर्वपक्षीय नगरसेवक तसेच स्वच्छता व मोटारवाहन विभागाकडून जेसीबी, कचरा जमा करण्यासाठी टिप्पर, घंटागाडी आदी यंत्रणा सरसावली होती. एलईडी पथदिव्यांसाठी ‘ईईएसएल’वर शिक्कामोर्तबआज रोजी शहरात २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिवे उभारल्या जात आहेत. याव्यतिरिक्त केंद्र शासनाने प्रमाणित केलेल्या ‘ईईएसएल’कंपनीला एलईडीसाठी नियुक्त केले आहे. याबदल्यात मनपा १३ कोटी ९० लक्ष रुपये व देखभाल दुरुस्तीपोटी ६ कोटी असे एकूण १९ कोटी ९० लक्ष रुपये अदा करणार आहे.शहर हगणदरीमुक्त; केंद्रीय समितीची मंजुरीकेंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात १८ हजार पेक्षा जास्त वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली. गुड मॉर्निंग पथकाच्या जनजागृतीमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय घटली. केंद्रीय समितीने पाहणी केल्यानंतर शहराला हगणदरीमुक्त घोषित केले.रोजगाराची संधी; शहरात ‘मदर डेअरी’चा श्रीगणेशाकेंद्र व राज्य शासनाचा संयुक्तिक प्रकल्प असलेल्या ‘मदर डेअरी’च्या माध्यमातून सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. मनपाच्या १८ जागेवर डेअरी उभारण्याला सत्तापक्षाने मंजुरी दिली असून, तोष्णीवाल ले-आउट परिसरात नुकताच श्रीगणेशा झाला आहे.या मुद्यांवर गाजली महापालिका!

सिमेंट रस्त्यांचे पितळ उघडे; भाजपा अडचणीत२०१७ मधील मनपा निवडणुकीच्या पूर्वी मोठा गाजावाजा करत भाजपासह प्रशासनाने दुरुस्ती केलेल्या सिमेंट रस्त्यांचे पितळ अवघ्या सहा महिन्यांत उघडे पडले. जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार रस्त्यांचे सोशल आॅडिट केले असता सर्व पाच रस्ते निकृष्ट आढळून आले आहेत. या प्रकरणामुळे सत्तापक्ष भाजपाची अडचण निर्माण झाली आहे.

विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण अडचणीतसभागृहातील वर्तनावर आक्षेप घेत सत्तापक्ष भाजपाने काँग्रेसचे गटनेता तथा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यासंदर्भातील ठराव अद्याप शासनाकडे सादर करण्यात आला नाही, हे येथे उल्लेखनीय. 

आयुक्त जितेंद्र वाघ यांचा मनपाला रामराम भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादाला कंटाळून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शासनाकडे बदलीसाठी अर्ज केला होता. आॅक्टोबर महिन्यांपासून ते प्रदीर्घ रजेवर होते. अखेर नगर विकास विभागाने २० डिसेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेत कार्यरत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची मनपा आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश जारी केले.

भूमिगत गटार योजना; शिवसेनेकडून आरोपांच्या फैरीभूमिगत गटार योजनेंतर्गत सुरू असलेल्या मोर्णा नदीपात्रातील मलवाहिनीच्या खोदकामावर शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, गटनेता राजेश मिश्रा यांनी जोरदार आक्षेप नोंदवत हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर शासनाने चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती सर्व कामे नियमानुसार सुरू असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला. या अहवालावर शिवसेनेने सोयीस्कर चुप्पी साधली आहे.

मनपाची करवाढ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची याचिकामनपाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर सुधारित करवाढ केली. ही करवाढ अवाजवी असल्याने नमूद करीत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांनी शासनाकडे तक्रार केली. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. अद्यापही सदर प्रकरण प्रलंबित आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका