सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:13 PM2019-11-16T12:13:50+5:302019-11-16T12:14:06+5:30

सोन्याच्या बांगड्यांवर हात साफ केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली.

Gold jewelery worth 1.75 lakhs looted in Akola | सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: रतनलाल प्लॉटमधील एकता ज्वेलर्स नामक सराफा दुकानामध्ये सोन्याच्या बांगड्या खरेदी करण्याचा बहाणा करीत, बुरख्यातील दोन महिला व एका अनोळखी पुरुषाने ४0 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्यांवर हात साफ केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रतनलाल प्लॉटमधील एकता ज्वेलर्सचे संचालक मनीष कटारिया यांनी शुक्रवारी दिलेल्या तक्रारीनुसार बुरखा परिधान केलेल्या दोन महिला व एक पुरुष दोन लहान मुलांसह सराफा दुकानात आले.
दुकानात आल्यावर सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्या असल्याने बांगड्या दाखविण्यास सांगितले. त्यानुसार दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना सोन्याच्या विविध प्रकारच्या बांगड्या दाखविल्या; परंतु त्यांचे समाधान होत नव्हते. सातत्याने या बांगड्या नको, त्या दाखवा, असे म्हणत त्यांनी नजर चुकवून दुकानातील ४0 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या चोरल्या आणि काही मिनिटांमध्ये दोन महिला व पुरुष दुकानातून निघून गेले. काही वेळाने कर्मचाऱ्यांना दोन बांगड्या नसल्याचे दिसून आल्यावर त्यांना संशय आला. चोरीला गेलेल्या सोन्याच्या बांगड्यांची किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे.
मनीष कटारिया यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी दुकानात भेट देऊन सीसी कॅमेºयातील चित्रण तपासले.
त्यात दोन महिला व एक पुरुष स्पष्ट दिसून येत आहेत. पोलिसांनी सीसी कॅमेºयातील चित्रण घेतले असून, त्याआधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Gold jewelery worth 1.75 lakhs looted in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.