Girl Molested by showing chocolate at Akola | चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीचा विनयभंग
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीचा विनयभंग

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका दहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला मंगळवारी अटकही केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
खदान परिसरातील एका मुलीला सकाळी तिच्या आईने शाळेत सोडले व ती मोलमजुरी करण्यासाठी निघून गेली; मात्र त्यानंतर मुरलीधर हरिराम केसवानी या नराधमाने या मुलीला चॉक लेट देण्याचे आमिष देऊन अश्लील वर्तन केले. हा प्रकार मुलीच्या शाळेतील मैत्रिणीकडे व नंतर ती बाब शिक्षिकेच्या कानावर जाताच शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. चॉकलेट देतो, असे म्हणून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे मुलीने कथन केले. शिक्षकांनी लगेच मुलीच्या आईला फोन करून शाळेत बोलावून घेतले व पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे सांगितले. त्यानंतर मुलीची आई व ती स्वत: पोलीस ठाण्यात गेले. तेथे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपी मुरलीधर हरिराम केसवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३५४ अ, पोस्को कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

 

Web Title: Girl Molested by showing chocolate at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.