शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आवारात टाकला कचरा

By admin | Updated: May 7, 2015 01:30 IST

कच-याच्या मुद्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

अकोला: मनपा प्रशासन कोट्यवधींचे देयक अदा करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे घनकचर्‍याचे व्यवस्थापन करणार्‍या कंत्राटदाराने कचरा उचलणे बंद केले. यामुळे शहरात सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली असून, अकोलेकरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन व सत्ताधारी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी बुधवारी मनपात आवारात दोन ट्रक घाणीने भरलेला कचरा आणून टाकल्याचा प्रकार घडला.शहरातील कचरा उचलण्याचा कंत्राट खासगी तत्त्वावर देण्यात आला असून, हा कंत्राट १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला. कंत्राटाची मुदत लक्षात घेता, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी तत्काळ नवीन निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. परंतु, कंत्राटदाराला थकीत देयक अदा न करता तात्पुरती मुदतवाढ देऊन आयुक्त ांनी ठोस निर्णय घेण्यास चालढकल केली. वैतागलेल्या कंत्राटदाराने १ मे पासून कचरा उचलण्याचे काम बंद केले. यामुळे शहरातील मुख्य मार्गांसह ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले. दुर्गंधी व घाणीमुळे अकोलेकरांचा जीव मेटाकुटीला आला तरी त्यावर सत्ताधार्‍यांसह प्रशासन कोणताही निर्णय घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी मनपा आवारात घाणीने भरलेले दोन ट्रक कचरा आणून टाकला. यामधील एक ट्रक आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या दालनासमोर, तर दुसरा ट्रक महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनासमोर रिकामा केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे मनपात प्रचंड धावपळ उडाली, तर दुर्गंधीमुळे अधिकारी, कर्मचार्‍यांचे हाल झाल्याचे चित्र दिसून आले.