टँकरमधून पेट्रोल, डीझलची चोरी करणारी टोळी कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:05 IST2019-06-24T14:05:06+5:302019-06-24T14:05:19+5:30

टँकरमधून पेट्रोल, डीझल चोरी करताना सहा जणांच्या टोळीला विशेष पोलीस पथकाने अटक केली.

 Gangs stealing petrol and diesel from the tankers | टँकरमधून पेट्रोल, डीझलची चोरी करणारी टोळी कारागृहात

टँकरमधून पेट्रोल, डीझलची चोरी करणारी टोळी कारागृहात

अकोला: पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पोलीस पथकाने कोळंबी येथील रॉयल ढाब्यावर शनिवारी दुपारी छापा टाकून ६ लाख ६0 हजार रुपये किमतीच्या पेट्रोल, डीझलच्या साठ्यासह टँकरमधून पेट्रोल, डीझल चोरी करताना सहा जणांच्या टोळीला अटक केली. या टोळीला बोरगाव मंजू पोलिसांनी रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास रॉयल ढाब्यावर छापा टाकून ढाब्यामागे उभ्या असलेल्या एमएच ३0 एल ४२६८ क्रमांकाच्या टँकरमधून प्लास्टिक नळीच्या मदतीने पेट्रोल, डीझलची चोरी करणाऱ्या नदीम अहमद शेख (२२ रा. आकाशवाणीसमोर अकोला), मोहम्मद आबिद शेख करीम (१८ रा. बेगम मंजील खदान), गजानन वाल्मीक चक्रनारायण (३0 रा. दाळंबी), शेख मोहम्मद शेख इब्राहिम (१९ रा. बेगम मंजील खदान), सैयद आकिब सैयद अलीम (२५ रा. गंगा नगर वाशिम बायपास) आणि टँकर चालक गुलाम फरिद गुलाम फारूख (२९ रा. पोळा चौक) यांना अटक केली होती. पोलिसांनी या टोळीकडून ५ लाख रुपये किंमतीचे ९ केएल डीझल, १ लाख ६0 हजार रुपये किमतीचे ३ केएल पेट्रोलच्या साठ्यासह १५ लाख रुपये किमतीच्या टँकरसह एकूण २१ लाख ९१ हजार ३८0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. विशेष पोलीस पथकाने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात दिले. बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)
 

 

Web Title:  Gangs stealing petrol and diesel from the tankers