जिल्ह्यातील गुन्हेगारांची टोळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:08 IST2022-09-19T17:07:24+5:302022-09-19T17:08:48+5:30

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा आदेश, सण उत्सवामुळे कारवाई.

Gang of criminals in the district exiled for two years akola | जिल्ह्यातील गुन्हेगारांची टोळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

जिल्ह्यातील गुन्हेगारांची टोळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

सचिन राऊत

अकोला : अकोट फाईल पाेलीस ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यातील विविध भागात टाेळीने गुन्हे करणाऱ्या ताज नगर येथील रहीवासी असलेल्या दाेन जणांच्या टाेळीला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने सोमवारी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे १५८ पेक्षा अधिक टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

ताज नगर येथील रहिवासी मोहम्मद रिजवान मोहमद लुकमान (वय २८ वर्ष) व मोहम्मद रिहान मोहम्मद लुकमान  (२४) हे दोघेजण शहरासह जिल्हयात टाेळीने गुन्हे करीत असल्याची माहीती पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांना मीळाली. या माहितीवरून या टाेळीतील गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता या टाेळीतील दाेन जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून अकोट फाईल पोलिसांनी या टाेळीतील दाेन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली.

अकोट फाईल पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या गुन्हेगारी टाेळीतील दाेन जणांनी टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली. मात्र, दोन्ही गुन्हेगार पाेलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Web Title: Gang of criminals in the district exiled for two years akola