निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ

By राजेश शेगोकार | Published: September 9, 2022 12:37 PM2022-09-09T12:37:46+5:302022-09-09T12:38:08+5:30

विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी श्रध्देचा निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाई गणपतीची आरती झाल्यावर सुरवात झाली

ganesh procession starts with aarti to Lord Barabhai Ganesha in Akola | निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ

निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ

Next

अकोला  :  

विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी श्रध्देचा निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाई गणपतीची आरती झाल्यावर सुरवात झाली  तत्पूर्वीच भाविकांनी घरगुती गणेश मंडळाचे भक्तीमय वातावरण विसर्जन केले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

कोरोना विषाणू संक्रमणानंतर यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात श्रींचा उत्सव साजरा झाला  ‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या’,अशा जयघोषात बाप्पांला आबालवृध्द भाविकांनी श्रध्देचा निरोप दिला.

सकाळी  ११वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीच्या वतीने मानाच्या बारभाई गणपतीचे पूजन करण्यात आले यावेळी आमदार वसंत खंडेलवाल माजी मंत्री गुलाबराव गावंडे , माजी मंत्री डॉक्टर रणजीत पाटील,माजी आमदार बबनराव चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, उत्सव समितीचे अध्यक्ष एडवोकेट मोतीसिंग मोहता सिद्धार्थ शर्मा पोलीस अधीक्षक श्रीधर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी मान्यवरांनी गणेशाचे पूजन केले. यावेळी  यांच्यासह अनेक मान्यवर गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होते

गणेश विजर्सनासाठी तगडा बंदोबस्त
 विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे गुरुवारी संध्याकाळी अकोला शहरातून रूट मार्च काढत पोलिसांनी शांततेचे आवाहन केले नागरिकांनी मिरवणुकीत उत्साहात आनंदाने सहभाग घ्यावा मात्र कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस विभागाने केले असून गुरूवारी रात्री पोलीस अधीक्षक यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली होती

अशी आहे परंपरा 
लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्यावेळी किल्ला परिसराजवळील छोट्याशा अकोला शहरात पाच – सहा गणेश मंडळाची स्थापना झाली होती. त्यावेळी मिरवणुकीमध्ये प्रथम स्थानाचा मान बारभाई गणपतीला मिळाला होता. त्याकाळी कै. भगवाननाथजी इंगळेसह बाराजातीच्या लोकांनी मिळून या गणपतीची स्थापना केली होती. तेव्हाच या गणपतीला बारभाई गणपती हे नाव मिळाले. त्या काळच्या बाराजातींच्या लोकांनी स्थापन केलेल्या गणपतीचा वारसा आजही कै. इंगळे यांच्या परिवाराने कायम ठेवला आहे.

Web Title: ganesh procession starts with aarti to Lord Barabhai Ganesha in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.