शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
3
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
4
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
5
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
6
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
7
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
8
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
9
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
10
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
11
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
12
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
13
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
14
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
15
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
16
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
17
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
18
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
19
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
20
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)

मदतीने निराशा; आता पीक विम्याची आशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:00 IST

पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकऱ्यांची निराशा झाली.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकऱ्यांची निराशा झाली असून, आता पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ मिळाला पाहिजे, अशी आशा पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून केली जात आहे.गत महिनाभराच्या कालावधीत बरसलेल्या अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर, भात इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी राज्यपालांकडून १६ नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत मर्यादेत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च आणि पिकांचे बुडालेले उत्पादन बघता, पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकºयांची निराशा झाली आहे. पीक नुकसान भरपाईच्या सरकारी मदतीने निराशा केली असल्याने, आता किमान पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून केली जात आहे.पंचनामे ग्राह्य धरून पीक विम्याचा लाभ द्या!अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात १ कोटी १२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले; मात्र पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकºयांना विमा रकमेचा भरीव लाभ मिळाला पाहिजे.महसूल, कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पीक नुकसानाचे पंचनामे ग्राह्य धरून, विमा कंपन्यांनी शेतकºयांना पीक नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी