शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

दगडाने ठेचून मित्रानेच केली मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 2:40 PM

राजेश सुधाकर पिंपळे (५३) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते डाबकी रोड येथील रहिवासी आहेत

अकोला : डाबकी रोडवरील नर्मदा अपार्टमेंटजवळ दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका इसमाने त्याच्या मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. यातील आरोपी पळून जाण्याच्या बेतात असतानाच, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राजेश सुधाकर पिंपळे (५३) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते डाबकी रोड येथील रहिवासी आहेत. नवनाथ बंडू कारंडे असे आरोपीचे नाव आहे. मृतक राजेश आणि नवनाथ मित्र असून, त्यांच्यात बुधवारच्या रात्री दीड वाजताच्या दरम्यान दारूच्या कारणावरून वादविवाद झाला. याच वादात नवनाथन याने राजेशच्या डोक्यात सिमेंटचा दगड घातला. यामुळे राजेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना डाबकी रोड भागातील श्री राम टॉवरच्या परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडल्याने मृतदेह काही काळ तिथेच पडलेला होता. याप्रकरणी मृतकाचा मुलगा अभय राजेश पिंपळे यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.यावरून पोलिसांनी प्रथमत: आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.या घटनेची माहिती डाबकी रोड पोलिसांना देताच ठाणेदार विजय नाफडेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. सखोल चौकशी करून हा खूनच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी हा पळून जाण्याच्या बेतात असतानाच, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.--------------------------सीसी कॅमेऱ्यांची तपासणीया हत्याकांडानंतर डाबकी रोड पोलिसांनी तपास करताना परिसरातील सीसी कॅमेºयांची तपासणी सुरू केली आहे. राजेश सुधाकर पिंपळे यांची हत्या करण्यामागे आरोपी एकटाच आहे की आणखी काही साथीदार आहेत याचा शोध पोलीस घेत आहे. रम्यान,डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखून