शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

बँक मॅनेजर असल्याचे सांगून फसवणूक

By admin | Updated: February 16, 2015 02:10 IST

अकोट येथील प्रकार; गुन्हा दाखल.

आकोट: बँक ऑफ इंडिया शाखा आकोटचा मॅनेजर असल्याचे सांगून मोबाइलवरून एटीएम कार्ड व कोडची माहिती घेत फिर्यादीच्या खात्यातून ४४ हजार ५७0 रुपये लंपास केल्याची घटना १५ ते १६ जुलै २0१४ रोजी घडली होती. या प्रकरणी आकोट शहर पोलिसात दाखल फिर्यादीवरून आकोट पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी संबंधित मोबाइलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एम. जी. हार्डवेअर तर्फे मो. गालीब रहेमान यांच्या तक्रारीनुसार, १५ ते १६ जुलै २0१४ दरम्यान मोबाईल क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीने फिर्यादी व त्याच्या मुलाच्या मोबाइलवर फोन करून त्यांचा एटीएम कार्डचा नंबर व कोड खरा आहे का, असे विचारले. फिर्यादीने तो खरा असल्याचे सांगितल्यानंतर मोबाइलधारकाने, मी बँक ऑफ इंडिया शाखा आकोटचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून एटीएमची तपासणी सुरू आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक व पासवर्ड सांगा असे म्हटले. तो दिल्यानंतर तुम्ही २४ तास एटीएम कार्डचा वापर करू नका, असे सांगितले. त्यामुळे दुसर्‍या दिवशी फिर्यादीने खात्याची तपासणी केली असता ४४ हजार ५७0 रुपये परस्पर खात्यातून काढून घेण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादीवरून, पोलिसांनी मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.