‘त्या’ बँक कर्मचाऱ्याविरुद्ध चौथ्या मुलाचाही लैंगिक छळाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:23 IST2020-03-09T13:23:21+5:302020-03-09T13:23:28+5:30

नराधम गावंडे याच्या शोषणाचा चौथा मुलगाही बळी ठरल्याचे समोर आले.

A fourth child is also alleged sexual harassment against 'that' bank employee | ‘त्या’ बँक कर्मचाऱ्याविरुद्ध चौथ्या मुलाचाही लैंगिक छळाचा आरोप

‘त्या’ बँक कर्मचाऱ्याविरुद्ध चौथ्या मुलाचाही लैंगिक छळाचा आरोप

अकोला : जिल्हा को-आॅप बँकेत क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या जयप्रकाश नारायण गावंडे या नराधमाने लहान मुलांना चॉकलेट देण्याचे आमिष देऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार, ५ मार्च रोजी उघडकीस आल्यानंतर या प्रकरणातील चौथा पीडितही शनिवारी पोलीस तपासादरम्यान समोर आला आहे. या नराधमास पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या कोठडीत आहे.
जयप्रकाश नारायण गावंडे (५६) हा दररोज सायंकाळी बँकेतून घरी गेल्यानंतर याच परिसरातील इयत्ता सातवी ते आठव्या वर्गात शिकणाºया मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर तो त्याच्या घरी बोलवायचा. पीडित मुलांना चॉकलेट देण्याच्या आमिषाने तसेच पैसे देण्याच्या कारणावरून आरोपी त्यांना घरी बोलवायचा. त्यानंतर या मुलांसोबत अश्लील चाळे करीत होता. १९ फेब्रुवारी रोजी या तीन मुलांमधील एका पीडित मुलाचे आजोबाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर यासंदर्भात त्यांनी बँक अधिकाºयास जाब विचारला असता मुलांना वाईट उद्देशाने बोलवित नसल्याचा खुलासा आरोपीने केला. त्यानंतर आरोपीने पीडित मुलांच्या नातेवाइकांना धमकाविण्याचा प्रयत्न केला. अखेर या मुलांच्या पालकांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या तक्रारीवरून आरोपी जयप्रकाश गावंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन पीडित मुलांनी पहिल्याच दिवशी समोर येऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आणखी किती अल्पवयीन मुले पीडित आहेत, याचा तपास करीत असतानाच रविवारी आणखी एक पीडित समोर आला. त्यामुळे नराधम गावंडे याच्या शोषणाचा चौथा मुलगाही बळी ठरल्याचे समोर आले.

Web Title: A fourth child is also alleged sexual harassment against 'that' bank employee