राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातील चार खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 10:24 IST2021-03-23T10:23:57+5:302021-03-23T10:24:03+5:30

Akola Cricket Club अकोल्यातील सौरभ अरुण नेवारे, हर्षदीप सुनील सुरळकर, स्वागत शिवाजी चव्हाण आणि नयन संजय पोटे यांची निवड करण्यात आली आहे.

Four players from Akola selected for national cricket tournament | राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातील चार खेळाडूंची निवड

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातील चार खेळाडूंची निवड

अकोला : तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी स्थित रामकृष्ण परमहंस क्रीडांगण येथे २३ मार्चपासून आयोजित १९ वर्षावरील वरिष्ठ गटामध्ये राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातील सौरभ अरुण नेवारे, हर्षदीप सुनील सुरळकर, स्वागत शिवाजी चव्हाण आणि नयन संजय पोटे यांची निवड करण्यात आली आहे. ते महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. कन्याकुमारी येथे आयोजित राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या निवडीसाठी औरंगाबाद येथील टेनिस बॉल क्रिकेट राज्य संघाची निवड चाचणी नुकतीच घेण्यात आली. कोविडच्या प्रादुर्भावामुळे ही निवड चाचणी सरळ पद्धतीने घेण्यात आली. खेळाडूंची निवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव डॉ. मोहम्मद बाबर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या निवड चाचणीमध्ये अकोला जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सौरभ अरुण नेवारे, हर्षदीप सुनील सुरळकर, स्वागत शिवाजी चव्हाण आणि नयन संजय पोटे या चार खेळाडूंची निवड करण्यात आली. या सर्व खेळाडूंना शिवाजीराव चव्हाण यांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन लाभले. टेनिस बॉल क्रिकेट क्रीडा प्रकाराला नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षणाची घोषणा झाल्याने टेनिस बॉल क्रिकेटपटूंमध्ये उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी अकोल्यातील खेळाडूंची निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम जाधव, प्रकाश पोहरे, गणेश कुलकर्णी, राष्ट्रीय काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष संजय देशमुख, आशिष कांबळे आदींनी कौतुक केले.

Web Title: Four players from Akola selected for national cricket tournament