अकोला जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू, ३५३ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:34 IST2021-03-13T04:34:10+5:302021-03-13T04:34:10+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २६७७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २९२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

अकोला जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू, ३५३ कोरोना पॉझिटिव्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २६७७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २९२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३५९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील २३, अकोट येथील २१, जीएमसी येथील १५, खदान येथील ११, डाबकी रोड व पिंपळगाव येथील प्रत्येकी नऊ, मलकापूर येथील सहा, कौलखेड, गीता नगर, मोठी उमरी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, दानोरी, अनिकेत, गणेश नगर, अकोली जहाँगीरी व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी चार, आळसी प्लॉट, सुकोडा, खडकी, जठारपेठ, गोरक्षण रोड, अकोट फैल, फिरदोस कॉलनी, गायत्री नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी तीन, देशमुख फैल, तारफैल, गुलजारपुरा, सांगवी खुर्द, शंकर नगर, जीएमसी होस्टेल, पोलिस हेडक्वॉर्टर, कृषी नगर, तापडिया नगर, लहान उमरी, गोपालखेड, ताकवाडा, गोरेगाव बु., बार्शीटाकळी, सिंधी कॅम्प, पोळा चौक, सिव्हील लाईन्स, शिवाजी पार्क, रजपूतपुरा, निमकर्दा व सातव चौक येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कुबा मशीद, दुर्गानगर, अंबिका नगर, रणपिसे नगर, माधवनगर, दत्ता कॉलनी, निमवाडी, व्हीएचबी कॉलनी, आनंदनगर, मित्रा नगर, जुने शहर, सिंधी कॅम्प, नया अंदुरा, वस्तापूर, एमआयडीसी, सरस्वती नगर, पंचशील नगर, कोठारी वाटिका, लक्ष्मी नगर, रामकृष्ण नगर, गौतम नगर, मुझ्झफर नगर, रुक्मिणी नगर, अकोली खुर्द, माधव नगर, दापुरा, रहानखेड, आपातापा, शिवनी, कवर नगर, पळसोबढे, कुरणखेड, चांदूर, जुने आरटीओ रोड, हिंगणा, अमानखा प्लॉट, मोमिनपुरा, रणपिसे नगर, राऊतवाडी, केशव नगर, गजानन नगर, वानखडे नगर, भीमनगर, खोलेश्वर, दगडी पूल, चांडक प्लॉट, गजानन नगर, लोथखेड, करोडी, खेताननगर, सांगवी बाजार, उमरी, बोरगाव वैराळे व न्यू तापडीया नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
सायंकाळी केशवनगर येथील सात, खडकी येथील सहा, खेतान नगर येथील पाच, वर्धमान नगर येथील चार, मलकापूर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, जीएमसी, राऊतवाडी व मयूर कॉलनी येथील प्रत्येकी दोन, पातूर, जुने शहर, न्यू तापडिया नगर, तापडिया नगर, सिव्हील लाईन, संत नगर, बायपास रोड, मोठी उमरी, रिंग रोड, डाबकी रोड, न्यू राधाकिसन प्लॉट, कुंभारी, निमवाडी, गंगा नगर, फिरदोस कॉलनी, बाजोरीया नगर, रतनलाल प्लॉट, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, जठारपेठ, देशमुख फैल, अकोट फैल, गणेश नगर, आयटीआय, संजीव नगर, माधव नगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
चौघांचा मृत्यू
तेल्हारा येथील ५५ वर्षीय पुरुष, विठ्ठल नगर कौलखेड येथील ८२ वर्षीय महिला व कानशिवनी येथील ६० वर्षीय महिला व बोरगाव वैराळे येथील ७३ वर्षीय पुरुष
अशा चार रुग्णांचा शुक्रवारी मृत्यू झाला. तिघांना अनुक्रमे ६ मार्च, ११ मार्च,२८ फेब्रुवारी व ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
२९९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५०, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, नवजीवन हॉस्पिटल येथून सात, हॉटेल रिजेन्सी येथून चार, सहारा हॉस्पिटल येथील एक, युनिक हॉस्पिटल येथील एक, आयुर्वेदिक महाविद्यालयातून चार, बाॅईज होस्टेल अकोला येथून १५, हॉटेल स्कायलार्क येथून सात, तर होम आयसोलेशन येथील २०० आशा एकूण २९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४,८९९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २०,५८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १५,२९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३९७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,८९९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.