शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘फोर-जी’ची बैठक उधळली!

By admin | Updated: June 17, 2015 02:13 IST

काँग्रेसचा हल्लाबोल; आयुक्त, नगरसेवकांची धावाधाव.

अकोला: अकोलेकरांना मूलभूत सुविधा पुरविण्यापेक्षा फोर-जीच्या खोदकामाला प्राधान्य देणार्‍या आयुक्त सोमनाथ शेटे यांनी स्थानिक विश्रामगृहावर आयोजित केलेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीवर मंगळवारी काँग्रेसने हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण व काँग्रेस नगरसेवकांनी आयुक्तांची बैठक उधळून लावत सत्ताधार्‍यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. या प्रकारामुळे आयुक्तांसह उपस्थित सत्तापक्षातील नगरसेवकांची अक्षरश: धावाधाव झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. येत्या आठवड्यात संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन होत असून, त्यानंतर रमजान महिन्याला प्रारंभ होईल. गजानन महाराजांच्या पालखीचा शहरात दोन दिवस मुक्काम असतो. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणांसह कानाकोपर्‍यात प्रचंड प्रमाणात घाण साचली आहे. मुख्य रस्त्यालगतचे नाले,गटारे घाणीने तुडुंब साचले असताना महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजप-शिवसेना ढिम्म आहे. प्रभागनिहाय नाला सफाईला सुरुवात झाल्याचा दावा आयुक्त सोमनाथ शेटे यांच्याकडून होत असला तरी प्रत्यक्षात नाला सफाईची कामे ठप्प पडून आहेत. मनपातील पदाधिकारी व बोटावर मोजता येणार्‍या नगरसेवकांच्या प्रभागात नाला सफाईची कामे सुरू झाली असून, इतर भागात मात्र घाणीमुळे अकोलेकरांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. पहिल्याच पावसात नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचले तर सर्व्हिस लाईन काटेरी झाडे-झुडपांनी वेढल्या गेल्याचे चित्र आहे. रस्ते, पथदिवे व पाणीपुरवठय़ाची सेवा पूर्णत: कोलमडली आहे. पावसामुळे वातावरणातील बदल लक्षात घेता, शहरात साथ रोगांचा उद्रेक होण्याची चिन्हं असताना आयुक्त सोमनाथ शेटे यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता स्थानिक विश्रामगृह येथे फोर-जीच्या खोदकामाला परवानगी देण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले. हा प्रकार ध्यानात येताच, विरोधी पक्षनेता साजीद खान, नगरसेवक दिलीप देशमुख, शेख अजीज यांसह इतर नगरसेवकांनी थेट बैठकीवरच हल्लाबोल केला. यामुळे विश्रामगृहावर जमलेल्या आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांना अक्षरश: पळ काढावा लागला.