शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अपघात टाळा! - महावितरणचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 3:55 PM

विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत ग्राहकांनी सूचनांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्दे जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणा-या विजतारांपासून सावध राहावे . पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी.मिटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मिटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलून घ्यावी.

अकोला: आज जीवनामध्ये विजेचे महत्व व फायदे वाढलेले आहेत, मात्र सावधानता बाळगली नाहीतर नुकसानही होऊ शकते. या वेळी सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे, पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे अपघात घडल्याचा दुदैर्वी घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत ग्राहकांनी सूचनांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे.विजांचा कडकडाट होत असलेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणा-या विजतारांपासून सावध राहावे व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी. पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा, कारण अनावधाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दुरचित्रवाणीची डिश किंवा अन्टेना विजतारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्ती करतांना मेन स्वीच बंद करावा. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषता: मिटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मिटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत व विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारू नये. वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा. तार तुटल्यास वा पोल पडल्यास तसेच बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.येथे नोंदवा तक्रारग्राहकांच्या तक्रारींचे निवारण वेळेत व्हावे, यासाठी २४/७ ग्राहक सुविधा केंद्र आहे. ग्राहकाने त्यांच्या मोबाईल किंवा घरातील इतर फोन द्वारे १८००२३३३४३५, १८००१०२३४३५ वा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.पावसाळ्यात विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या घटना पाहता अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे आहे. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहावे.- विकास आढे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण