Five people were critical in two accidents in Akot taluka | अकोट तालुक्यात दोन अपघातात पाच जण गंभीर

अकोट तालुक्यात दोन अपघातात पाच जण गंभीर

अकोट/चोहोट्टा बाजार : अकोट तालुक्यात १५ मार्च रोजी झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. अंजगाव मार्गावर मालवाहू वाहनाने कारला धडक दिल्याने पती-पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाला. तसेच अकोट-अकोला रस्त्यावर खासगी बसला मालवाहू वाहनाने धडक दिल्याने तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.
तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु. येथील कोल्हे कुंटुब हे एमएच ३० पी ४५१६ क्रंमाकाचे इंडिका कारने अकोटकडे येत होते. तसेच अंजनगावकडे मालवहु वाहन क्र.एमएच ४६ एआर २८८० जात होते.दिवठाणा नजीक मालवाहु वाहनाने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये चंद्रकांत तुळशिराम कोल्हे, शालीनी चंद्रकांत कोल्हे हे गंभीर जखमी झाले तर मुलगा किरकोळ जखमी झाला. जखमीना त्वरीत उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले.
अकोट-अकोला रस्त्यावर वेताळ बाबांच्या मंदिराजवळ खासगी बस आणि मालवाहु वाहनाची धडक झाली. यामध्ये तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना परस्पर रुग्णालयात हलविण्यात आल्याने नावे कळू शकली नाहीत.
 

भरधाव ट्रक नागरी वस्तीत शिरला, सुदैवाने प्राणहानी टळली
पातूर/शिर्ला : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक नागरी वस्तीत शिरला. ही घटना पातुर-बाळापुर महामार्गावरील बाभुळगाव जवळ रविवारी घडली. यामध्ये सुदैवाने प्राणहानी टळली. बाभुळगावजवळ दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मध्यप्रदेश येथे माल घेउन जात असलेला ट्रक क्र. एमपी ०९-एचएच ३१५१ गावात शिरला. यावेळी रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या महिलेचे प्राण वाचले.

 

Web Title: Five people were critical in two accidents in Akot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.