शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पहिल्यांदाच रुबेला, गोवरचे दुहेरी लसीकरण; विभागात २६ लाखांवर बालकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 1:55 PM

अकोला : यंदा पहिल्यांदाच रुबेला व गोवरचे दुहेरी लसीकरण होणार असून, विभागातील तब्बल २६ लाख ६९ हजार ४४५ मुलांना लस दिली जाईल. त्या अनुषंगाने विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाला २३ लाख लस प्राप्त झाल्या आहेत.

अकोला : यंदा पहिल्यांदाच रुबेला व गोवरचे दुहेरी लसीकरण होणार असून, विभागातील तब्बल २६ लाख ६९ हजार ४४५ मुलांना लस दिली जाईल. त्या अनुषंगाने विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाला २३ लाख लस प्राप्त झाल्या आहेत.हवेतून पसरणाऱ्या संसर्गजन्य थेंबामुळे गोवरचा प्रादुर्भाव होतो. गोवर आणि रूबेला अतिशय संसर्गजन्य रोग आहे. त्याचा सर्वाधिक धोका १५ वर्षाखालील बालकांना आहे. त्यामुळे या मोहिमेंतर्गत ९ महिने पूर्ण केलेल्या तसेच १५ वर्षाखालील वयोगटावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र २७ नोव्हेंबरपासून गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यंद पहिल्यांदाच रुबेला आणि गोवरचे दुहेरी लसीकरण करण्यात येत आहे हे विशेष. उपक्रमांतर्गत विभागातील २६ लाख ६९ हजार ४४५ बालकांना लस दिली जाईल. यामध्ये विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालये, अंगणवाडी केंद्र, मदरसा आदि ठाकाणी लस दिली जाईल. यामध्ये एमआर, एमएमआरचे यापूर्वी लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण झालेल्या बालकांचा समावेश असणार आहे. उपक्रमांतर्गत पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड यांनी केले आहे.भविष्यातील पिढी सशक्तरुबेला व गोवरच्या लसीकरणामुळे भविष्यातील पिढी सशक्त होईल.शिवाय, भविष्यात जन्माला येणाºया बालकांचे वजन व बौद्धीक क्षमता उत्तम राहण्यास मदत होईल. त्याची सुरुवात आतापासूनच या लसीकरणाद्वारे करा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जिल्हानिहाय लसीकरणजिल्हा - बालकंअकोला - ३,१२,५१५अमरावती - ५,२३,३७२वाशिम - ३,११,१९१बुलडाणा - ७,७८,२५५यवतमाळ - ७,०८,१२३लसीकरणामुळे बालकांचा आजारांपासून बचाव होईल. शिवाय,भविष्यातील पिढीही आरोग्य दृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे नागरिकांनी आपल्या पाल्यांना रुबेला व गोवरचे लसीकरण करावे.- डॉ. व्ही. फारूकी, आरोग्य उपसंचालक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य