शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

फटाके उठले जीवावर

By admin | Updated: October 18, 2014 00:40 IST

अकोल्यात नियमांची पायमल्ली करुन गल्ली-बोळात, चौका-चौकात फटाक्यांची दुकाने.

अकोला : निवडणुकीच्या धामधुमीनंतर दिवाळीची चाहूल लागली असून, शहरात सर्वत्र बाजारपेठ गजबजली आहे. रंगीबेरंगी वस्त्र, आकाश कंदीलसोबतच फटाक्यांची दुकानेही ठिकठिकाणी सजली आहेत. मनपाने फटाके विक्रेत्यांना विक्रीसाठी अकोला क्रिकेट क्लब मैदानाची जागा दिली असल्यावरही शहरातील गल्ली- बोळात, चौका-चौकात फटाक्यांची विक्री करण्यात येत आहे. ही नियमांची पायमल्ली असून, यामुळे अघटित घटना घडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हय़ात दरवर्षी अंदाजे दोन कोटींच्या वर फटाक्यांचा धुव्वा उडविला जातो. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हय़ात ५८३ जणांना, तर अकोला उपविभागात ३३४ जणांना फटाके विक्रीचा अधिकृत परवाना दिला आहे. महानगरपालिकेने शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानाची जागा फटाके विक्रेत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. तसेच कोणते फटाके विकावे, याचे नियमही ठरवून दिले आहेत; मात्र दिवाळीमध्ये अनेक नागरिक फटाके विक्रीचा व्यवसाय करतात. शहरातील गल्ली बोळात, घरासमोर खाट टाकून तसेच चौका-चौकात दुकाने सुरू करून फटाके विक्री करण्यात येते. यामुळे केव्हाही अघटित घटना घडण्याची शक्यता आहे. मनपाने ठरवून दिलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वाहनासह अन्य सुविधा असतात. अन्यत्र मात्र कोणत्याच सुविधा नसतात. त्यामुळे वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिकृत परवाना असलेल्या दुकानदाराकडून मनपाने ठरवून दिलेल्या जागेवरूनच फटाके खरेदी करण्याची खबरदारी नागरिकांनी घ्यायला हवी. कारण यातच नागरिकांचे आणि संपूर्ण गावाचे भले आहे. अनधिकृतपणे फटाके विकणार्‍यांना नागरिकच चाप लावू शकतात. त्यासाठी नागरिकांनी दक्षता पाळणे आवश्यक असून जागृती गरजेची आहे.