गोदामाला आग; साहित्य जळून खाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:41 IST2019-05-18T12:40:36+5:302019-05-18T12:41:19+5:30

अकोला : शहरातील पातूर रोडवरील एका गोदामाला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

Fire to Godown fire at Akola | गोदामाला आग; साहित्य जळून खाक!

गोदामाला आग; साहित्य जळून खाक!

अकोला : शहरातील पातूर रोडवरील एका गोदामाला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये कुठल्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही; परंतु लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पातूर रोडवरील पाटणी स्टोरेज समोर समीर खान लाल यांचे बंगाल गोदाम आहे. या गोदामाला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गोदामाचा परिसरच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. परिसरातील झाडे, लाकडेसुद्धा जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग अटोक्यात आणण्याचा प्रयतन केला; मात्र तोपर्यंत गोदामातील संपूर्ण साहित्य, फर्निचर, लाकडे जळून खाक झाले. यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी गोदामात असलेले सिलिंडर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचे रौद्र रूप पाहता, कर्मचाºयांना सिलिंडर बाहेर काढता आले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुचाकी, चारचाकी वाहने मात्र जळाली. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Fire to Godown fire at Akola