फर्निचरच्या कारखान्याला आग, फर्निचर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 10:51 IST2021-06-01T10:51:10+5:302021-06-01T10:51:17+5:30

Fire News : काही वेळाने ही आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत कारखान्यातील बरेचशे साहित्य जळून खाक झाले होते.

Fire the furniture factory, burn the furniture | फर्निचरच्या कारखान्याला आग, फर्निचर जळून खाक

फर्निचरच्या कारखान्याला आग, फर्निचर जळून खाक

अकोला : शहरातील अकोट रोड परिसरातील तीन टॉवरजवळ असलेल्या एका फर्निचरच्या कारखान्याला अचानक आग लागल्याने कारखान्यातील फर्निचर जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत तब्बल चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

शहरातील अकोट रोड परिसरात तीन टॉवरजवळ फर्निचर बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्याला अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या वेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र आग आटोक्यात येत नव्हती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर काही वेळाने ही आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत कारखान्यातील बरेचशे साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Fire the furniture factory, burn the furniture