नेकलेस मार्गावरील कपड्याच्या दुकानाला आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 09:31 IST2018-03-06T09:31:59+5:302018-03-06T09:31:59+5:30

अकोला : रतनलाल प्लॉटस्थित 'किड्स मेन्स वेअर' या लहान मुलांच्या रेडिमेड कपड्याच्या दुकानाला सोमवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास आग लागली.

Fire at the clothing store on the Necklace street! | नेकलेस मार्गावरील कपड्याच्या दुकानाला आग!

नेकलेस मार्गावरील कपड्याच्या दुकानाला आग!

ठळक मुद्देरतनलाल प्लॉट मधील घटनारात्री 1 वजताच्या सुमारास लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रतनलाल प्लॉटस्थित 'किड्स मेन्स वेअर' या लहान मुलांच्या रेडिमेड कपड्याच्या दुकानाला सोमवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास आग लागली. दुकानाच्या आत लागलेल्या आगीबाबत परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. तात्काळ पाण्याच्या बंब घेऊन अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व बंद दुकानाचे शटर तोडून त्यांनी पाण्याचा मारा केला. या घटनेत दुकानातील बहुतांश माल जळून खाक झाला आहे. रात्री 2.30 वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी अशी चर्चा घटनास्थळावर होती. 

Web Title: Fire at the clothing store on the Necklace street!