बीएसएनएल निवासस्थान परिसरात आग
By Admin | Updated: May 13, 2014 22:25 IST2014-05-13T21:50:05+5:302014-05-13T22:25:08+5:30
बीएसएनएल निवासस्थान परिसरामध्ये कचर्याला लागलेल्या आगीमध्ये बीएसएनएलची तार जळून खाक झाली.

बीएसएनएल निवासस्थान परिसरात आग
अकोला: कृषी नगर भागातील बीएसएनएल निवासस्थान परिसरामध्ये कचर्याला लागलेल्या आगीमध्ये बीएसएनएलची तार जळून खाक झाली. ही आग मंगळवारी दुपारी लागली. आगीमध्ये किती रुपयांची तार जळून खाक झाली, हे स्पष्ट झालेले नाही.
कृषी नगर भागामध्ये भारत संचार निगमच्या कर्मचार्यांची निवासस्थाने आहेत. निवासस्थानांच्या परिसरातील कचर्याला अचानक आग लागली. कचर्याने पेट घेतल्याने परिसरातील बीएसएनएलची तार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या आगीत तार जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळावर पोहोचून आग नियंत्रणात आणली.