भटोरी येथे आग लागून सहा घरे खाक
By Admin | Updated: June 8, 2014 01:13 IST2014-06-07T22:32:47+5:302014-06-08T01:13:00+5:30
भटोरी या गावात शनिवार, ७ जून रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास आग लागून सहा जणांची घरे जळून खाक झाली आहेत.

भटोरी येथे आग लागून सहा घरे खाक
मूर्तिजापूर : तालुक्यातील भटोरी या गावात शनिवार, ७ जून रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास आग लागून सहा जणांची घरे जळून खाक झाली आहेत. या घटनेत १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मूर्तिजापूरपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या भटोरी येथे शनिवार, ७ जून रोजी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सहा शेतकर्यांची घरे जळून खाक झाली असून, त्यांचे कु टुंब उघड्यावर आले आहे. या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी, घरातील कपडे, कागदपत्रे आणि इतर साहित्यासह पेरणीकरिता आणलेले बियाणे जळून खाक झाल्यामुळे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सुभाष महादेव काटेकर, सुकवल जागोजी, देवीदास महादेव काटेकर, सुखदेव पाचडे, सुधाकर ठाकरे, रमेश रामदास पाचडे या शेतकर्यांची घरे जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे घटनास्थळी सुरू असलेल्या चर्चेवरून कळले. गावातील डॉ. कावरे, अमोल कावरे, भाऊराव टिके, राजू महल्ले, महेश सुरपे, दत्ता कावरे, मुकेश दशरथी, राजू महल्ले, मुन्ना प्रांजळे यांच्यासह गावकर्यांनी प्रयत्न क रून ही आग विझविली. घटनेची माहिती मिळताच तलाठी पुरी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या आगीत झालेल्या नुकसानीची तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
** शनिवार ७ जून रोजी भटोरीत लागलेल्या आगीत सहा घरे जळून खाक झाली. यामध्ये देवीदास महादेव काटेकर यांच्या घराचाही समावेश आहे. देवीदास काटेकर यांच्या मुलीचे शनिवार, ७ जून रोजीच लग्न होते; परंतु आगीत लग्नाचे सर्व साहित्य जळून खाक झाल्याने काटेकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले.