शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १६९ कंत्राटी कर्मचा-यांना मुदतवाढ

By admin | Updated: November 14, 2014 00:48 IST

अकोला मनपा कर्मचा-यांनी सोडला सुटके चा नि:श्‍वास.

अकोला : महापालिकेत कार्यरत १६९ कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मानधनाचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवून देण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. यासंदर्भात लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला,हे येथे उल्लेखली य. महापालिकेत मानधन तत्त्वावर १६९ कर्मचारी कार्यरत आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या निकाली काढण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय घेणे अपेक्षित होते. जलप्रदाय विभाग, बांधकाम, अतिक्रमण, नगर रचना विभागात मोठय़ा प्रमाणावर कंत्राटी अभियंता कार्यरत आहेत. एप्रिल २0१४ मध्ये मुदतवाढ देण्यासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक विलंब लावला. त्यावेळी मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून कर्मचार्‍यांची बोळवण केली. त्यावेळी कर्मचार्‍यांना चार महिन्यांची मुदतवाढ मिळाली. ऑगस्ट २0१४ मध्ये पुन्हा मुदतवाढ न देता, मानधनावरील कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचे अधिकार प्रशासनाला देण्याचा अजब प्रस्ताव तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या सभेत मांडला. कंत्राटी कर्मचार्‍यांना नियुक्ती देण्याची बाब धोरणात्मक असल्याने या प्रस्तावाला तत्कालीन महापौरांनी केराची टोपली दाखवताच प्रशासन तोंडघशी पडले. प्रशासनाच्या विसंगत भूमिकेमुळे तीन महिन्यांपासून कर्मचार्‍यांची नियुक्ती रखडली. शिवाय सहा महिन्यांचे मानधन देखील थकीत आहे. प्रशासनाची भूमिका लक्षात घेता, २३ कंत्राटी अभियंत्यांनी वेतनवाढीची मागणी केली. तर जलप्रदाय विभागातील अभियंत्यांनी काम बंद केले. याप्रकरणी महापौर, उपमहापौरांनी पुढाकार घेवून हा विषय तात्काळ मार्गी लावणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाच्या मनमानीसमोर सत्ताधारी कमालीचे हतबल असल्याचे चित्र समोर आले. अखेर उशिरा का होईना, सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा मुद्दा प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांच्यासमोर उपस्थित केला. यावर संपूर्ण कंत्राटी कर्मचार्‍यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.