शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:05 PM

अकोला : सोमठाणा शेतशिवारामध्ये घडलेल्या तसेच अकोल्यातील हायप्रोफाइल हत्याकांडातील एक असलेल्या किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.

अकोला : सोमठाणा शेतशिवारामध्ये घडलेल्या तसेच अकोल्यातील हायप्रोफाइल हत्याकांडातील एक असलेल्या किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी युक्तिवाद करताना दोन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विश्वासपात्र असल्याचे न्यायालयासमोर सांगितले, तर सोमठाणाचे पोलीस पाटील यांनी बचाव पक्षाने विचारलेल्या प्रश्नांना योग्य ते उत्तर न दिल्याने त्यांनी खोटा पुरावा दिला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शुक्रवारी पुन्हा सरकारी पक्ष न्यायालयात बाजू मांडणार आहे. या हत्याकांडाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे.शहरातील प्रतिष्ठित उद्योजक किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २०१५ रोजी आर्थिक वादातून सोमठाणा शेतशिवारात गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा आरोप रणजितसिंग चुंगडे, रूपेशसिंह चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी व राजू मेहरेवर आहे. किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. गुरुवारी युक्तिवाद करताना अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दोन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे विश्वासपात्र असल्याचे न्यायालयाला सांगून त्यांनी जस्सी व रणजितसिंग चुंगडे यांना घटनास्थळावर पाहिल्याचे सांगितले. आरोपींची दहशत यामुळे दोन्ही साक्षीदारांनी उशिरा बयान दिल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगून सोमठाणा येथील पोलीस पाटील यांनी मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादादरम्यान हो हो म्हणून खोटा पुरावा दिल्याचे निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पोलीस पाटील यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम कामकाज पाहत असून, आरोपींच्यावतीने अ‍ॅड. वसीम मिर्झा, अ‍ॅड. दिलदार खान, अ‍ॅड. प्रदीप हातेकर कामकाज पाहत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय