संबित पात्रा यांच्याविरुद्ध अकोल्यात युवक काँग्रेसकडून तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 19:18 IST2020-08-14T19:18:09+5:302020-08-14T19:18:30+5:30
ही तक्रार ठाणेदार यांनी चौकशीमध्ये ठेवली आहे.

संबित पात्रा यांच्याविरुद्ध अकोल्यात युवक काँग्रेसकडून तक्रार दाखल
अकोला : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरुद्ध युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश गणगणे यांनी सिटी कोतवाली पोलिसांत भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ, २९८, ३०४ अ आणि ५०५ नुसार तक्रार दाखल केली. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या काही वेळ आधी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात संबित पात्रा यांनी अभद्र भाषेचा वापर करीत राजीव त्यागी यांना अपमानजनक वागणूक दिली होती. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोपही गणगणे यांनी तक्रारीत केला आहे. ही तक्रार ठाणेदार यांनी चौकशीमध्ये ठेवली आहे. यावेळी अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.