संपत्तीच्या वादातून भावंडांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:42 IST2019-02-24T18:42:14+5:302019-02-24T18:42:50+5:30

अकोला : शहरातील हनुमान नगरात संपतीच्या वाटणीवरून दोन भावामध्ये हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये एक जन गंभीर जखमी झाला आहे.

fight between siblings from the wealth | संपत्तीच्या वादातून भावंडांमध्ये हाणामारी

संपत्तीच्या वादातून भावंडांमध्ये हाणामारी

अकोला : शहरातील हनुमान नगरात संपतीच्या वाटणीवरून दोन भावामध्ये हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये एक जन गंभीर जखमी झाला आहे.
लहाण उमरीतील हनुमान नगर येथील रहिवासी गणेश कृष्णराव देशमुख (४३) यांना वारसा हक्काने आई वडीलांकडून जागा मिळाली होती. मात्र त्यांचा भाऊ अतूल कृष्णराव देशमुख यांनी दारूच्या नशेत वारसाहक्काचे कागदपत्रे मागत संपत्तीच्या हिस्सेवाटीवरून वाद घातला. यावेळी त्यांच्यात झालेल्या शाब्दीक वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अतूल देशमुख यांनी गणेश देशमुख यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच कुश देशमुख, सुनिता देशमुख यांनीही शिविगाळ करत मारहाण केली. यामध्ये गणेश देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गणेश देशमुख यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सिव्हिल लाईन्स पोलिस करित आहेत.

Web Title: fight between siblings from the wealth