शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

कोरोनाशी लढा : डॉक्टरांच्या सुरक्षेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:01 AM

‘पर्सनल प्रोटेक्शन कीट’ आणि ‘एन-९५’ मास्क उपलब्ध करून देण्यात आले नाही.

ठळक मुद्दे दोनच ‘पर्सनल प्रोटेक्शन कीट’ कीट आणि मोजके ‘एन-९५’ मास्क उपलब्ध आहेत.एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसला, तरी संशयितांचा आकडा दहापेक्षा जास्त. नागरिकांचे आरोग्य जपत असताना डॉक्टरांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

कमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना समुपदेशन वॉर्डात दररोज शेकडो प्रवासी नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे; मात्र या ठिकाणी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना अद्यापही ‘पर्सनल प्रोटेक्शन कीट’ आणि ‘एन-९५’ मास्क उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे कोरोनाशी लढा देणाºया डॉक्टरांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विदेशातून येणाºया नागरिकांसह पुणे-मुंबईसह देशातील इतर मोठ्या शहरातून दररोज शेकडो प्रवासी अकोल्यात येत आहेत. शहरात येताच या नागरिकांची सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या ठिकाणी ज्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे, त्यांना प्रशासनातर्फे आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आले नाहीत. सध्या तरी ‘एचआयव्ही’ कीटवर गरज भागविली जात असली, तरी ही पुरेशी नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इतर शहरांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसला, तरी संशयितांचा आकडा दहापेक्षा जास्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्यांमध्ये एकाला जरी कोरोनाची लागण असेल, तर ते डॉक्टरांसह इतरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

डॉक्टरांचे आरोग्य जपणे अत्यावश्यक!लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या मर्यादित आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांचे आरोग्य प्रभावित झाल्यास कोरोनाविरुद्ध सुरू असलेला लढाही प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य जपत असताना डॉक्टरांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

तीन हजार ‘पी-पी’ कीटची मागणीसध्या तरी सर्वोपचार रुग्णालयाकडे केवळ दोनच ‘पर्सनल प्रोटेक्शन कीट’ कीट आणि मोजके ‘एन-९५’ मास्क उपलब्ध आहेत. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी ३ हजार ‘पी-पी’ कीटची आॅर्डर दिल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे; परंतु या कीट अद्यापही मिळाल्या नसल्याची माहिती आहे.

नागरिकांची हलगर्जी ठरू शकते घातकप्रवासातून येणारे शेकडो नागरिक कोरोना समुपदेशन कक्षात वैद्यकीय चाचणी करून घेत आहेत; मात्र यातील अनेक जण हलगर्जी करत असल्याचे निदर्शनास येते. त्यांची ही हलगर्जी डॉक्टरांसह इतरांसाठीही घातक ठरू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय