शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘अमृत’ योजनेचा खेळखंडोबा; मनपाने अदा केले ११७ कोटींचे देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:36 IST

भूमिगत व पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना तब्बल ११७ कोटी रुपयांचे देयक अदा केल्याची माहिती आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमृत अभियान अंतर्गत शहरातील भूमिगत गटार योजना तसेच पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. संबंधित कामांचा दर्जा न तपासता मनपा प्रशासनाने आजवर भूमिगत व पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना तब्बल ११७ कोटी रुपयांचे देयक अदा केल्याची माहिती आहे.अमृत अभियानांतर्गत भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून शहरातील घाण सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर सदर पाण्याचा शेती व उद्योगासाठी दुहेरी वापर करता येणार असल्याचा दावा सत्ताधारी भाजपच्यावतीने करण्यात आला होता. केंद्र व राज्य शासनाच्या मंजुरीनंतर मनपा प्रशासनाने ६१ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रकाशित केली असता ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनी ठाणे, यांची निविदा मंजूर करण्यात येऊन कार्यादेश देण्यात आला. मोर्णा नदी पात्रातून शिलोडा येथील २७ एमएलडीच्या मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत मलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले. आज रोजी या ठिकाणी पम्पिंग स्टेशनचे काम अर्धवट स्थितीत आहे. तसेच आपातापा येथून एक्स्प्रेस फिडर उभारण्यासाठी विद्युत वाहिनीचे काम रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीअभावी अर्धवट स्थितीत पडून आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, शिलोडा येथे उभारण्यात आलेल्या एसटीपी प्लांटच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित असतानासुद्धा या संपूर्ण कामाच्या गुणवत्तेची तपासणी न करता मनपाकडून संबंधित कंपनीला देयक अदा केल्याची माहिती आहे.अवघ्या दीड फुटांवर जलवाहिनीचे जाळेअमृत अभियानमधून संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलणे तसेच नवीन आठ जलकुंभ उभारण्यासाठी मनपा प्रशासनाने ८७ कोटी रुपयांची निविदा प्रकाशित केली होती. या कामासाठी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ नामक कंपनीला कंत्राट दिला आहे. कंपनीच्यावतीने जलवाहिनी टाकताना सर्व निकष, नियम बासनात गुंडाळून ठेवत शहरातील बहुतांश भागात अवघ्या एक ते दीड फुटावर जलवाहिनी टाकण्यात धन्यता मानली आहे.मनपाचे नियंत्रण नाही; देयक अदा करण्याची घाईअमृत अभियानसाठी राज्य शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली. भूमिगत गटार योजना असो व जलवाहिनीचे जाळे किंवा जलकुंभ उभारणे ही कामे करताना सर्व निकष, नियम पायदळी तुडविले जात आहेत. या संपूर्ण कामावर एमजेपीने देखरेख ठेवणे अपेक्षित असताना मनपाकडे केवळ देयकांच्या फायली सादर केल्या जात आहेत. त्यावर तांत्रिक सल्लागार एमजेपी असल्याचे सांगून हात झटकणाºया मनपाकडून केवळ देयक अदा केल्या जात आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका