सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 10:23 IST2020-10-12T10:22:37+5:302020-10-12T10:23:04+5:30

मोहन भाऊराव क्षीरसागर व त्याची सून सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला.

Father-in-law shof fire on Daughter in Law; Disputes over the exchange of money | सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद

सासऱ्याने झाडली सुनेवर गोळी; पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद

पारस : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद होऊन सासºयाने सुनेच्या पाठीवर गोळी झाडून जखमी केल्याची घटना बाळापूर तालुक्यातील बोरवाकडी येथे शनिवार, १० आॅक्टोबर रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० आॅक्टोबर रोजी बोरवाकडी येथे आरोपी मोहन भाऊराव क्षीरसागर व त्याची सून सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. आरोपीची वागणूक चांगली नसल्याने सुनेची गावात बदमानी करीत होता. सासरा व सुनेत काही बोलचाल झाल्यामुळे सासºयाने रागाच्या भरात सुनेच्या पाठीत गोळी झाडून जखमी केले. तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुनेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन क्षीरसागर याच्या विरोधात पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला असून, या संदर्भात पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Father-in-law shof fire on Daughter in Law; Disputes over the exchange of money