शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांची दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:28 AM

अकोला : शासनाने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर तपासणी करण्यात आली असून, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांची दमछाक होत असल्याच्या प्रश्नावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत, ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणी मांडल्या.

ठळक मुद्देशिवसेनेने सेतू केंद्रांवर केली तपासणी जिल्हाधिकार्‍यांकडे घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर तपासणी करण्यात आली असून, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांची दमछाक होत असल्याच्या प्रश्नावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत, ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणी मांडल्या.शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्‍चिम विदर्भ  संपर्कप्रमुख खा.अरविंद सावंत यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्यांचा आढावा घेतला. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर थकबाकीदार शेतकर्‍यांकडून‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. यासंदर्भात  शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर तपासणी केली असता, ‘सर्व्हर डाउन’ असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असून, एका शेतकर्‍याला कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी किमान तासाचा अवधी लागत आहे. तसेच ऑनलाइन अर्ज भरताना बायोमॅट्रिक मशीनवर संबंधित शेतकर्‍यासह पत्नीचा अंगठा आवश्यक असून, एक अर्ज भरण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येत आहे. सर्व्हर डाउन असल्याने १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना येणार्‍या अडचणींमुळे शेतकर्‍यांची दमछाक होत असल्याच्या प्रश्नावर शिवसेनच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी बुधवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे धाव घेत, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील अडचणी जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, प्रदीप गुरुखुद्दे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, दिनेश सरोदे, राहुल कराळे, अभिषेक खरसाळे, नगरसेवक मंगेश काळे, केदार खरे, सुनील डुकरे, सचिन थोरात, लक्ष्मण पंजाबी, सुनील दुर्गीया, रामा भांडे, प्रशांत अढाऊ, नकूल ताथोड, देवश्री ठाकरे, किशोर ठाकरे, योगेश अग्रवाल यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.

नवीन बायोमॅट्रिक मशीन लावण्याचे निर्देश  कर्जमाफीसाठी योजनेत ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणी तातडीने सोडविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांना दिले. तसेच ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांचा अंगठा घेण्यासाठी नवीन ३६३ बायोमॅट्रिक मशीन तातडीने सेतू केंद्रांवर कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना देत ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भात गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.